इंटरकास्ट मुलाशी प्रेम केलं म्हणून भावाने बहिणीला डोंगरावरुन ढकलून दिलं, संभाजीनगरात ऑनर किलिंग!
छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 17 वर्षीय मुलीचा 200 फूट डोंगवरुन खाली ढकलून खून करण्यात आला आहे. मुलीने आंतरराजीय मुलासोबत प्रेम केल्याने तिच्या चुलत भावाने तिला डोंगरावरुन ढकलून ठार केले. या घटनेने आता संभाजीनगर जिल्हा हादरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकरणातून मुलीच्या सख्या चुलत भावानेच तिला ढकलून देऊन संपवलं आहे. नम्रता गणेश शेरकर वय 17.2 वर्ष असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. तर ऋषिकेश तानाजी शेरकर वय 25 वर्ष असे ढकलून दिलेल्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं, वाचा सविस्तर?
अंबड तालुक्यातील शहागड येथील मुलगी घर सोडून निघून गेली होती. घरच्यांकडून जीवाला धोका असल्याची तक्रार मुलीनं शहागड पोलिसांना दिली होती. त्यानंतर घरच्यांची समजूत काढण्यासाठी मुलीला संभाजीनगरच्या वळदगाव येथे काकाच्या घरी पाठवले होते. त्यानंतर काकाचा मुलगा ऋषिकेश हा नम्रताला गोड बोलून खावडा डोंगरावर घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिला ढकलून दिले, त्यात तिचा मृत्यू झाला.
पोलिस घटनास्थळी दाखल, तपास झाला सुरू
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच आसपासचे अनेक लोक घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. प्रेम प्रकरणातूच ही हत्या झाल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ऋषिकेश तानाजी शेरकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.

आरोपी भावाचा व्हिडिओ आला समोर...!
बहिणीचा खून केल्यानंतर सदर भाऊ हा डोंगरावरुन खाली उतरताना त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. कारण, डोंगराच्या पायत्याशी काही तरुण क्रिकेट खेळत होते. तेव्हा त्या ठिकाणी शूटींग देखील केली जात होती. त्या शुटींगमध्ये डोंगरावरुन उतरणारा तरुण देखील दिसून आला. त्यानतंर पोलिस तपासात हा व्हिडिओ देखील समोर आला आहे.












Click it and Unblock the Notifications