Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Accident News : संभाजीनगरमध्ये ऊसाचा ट्रक पलटी, 6 मजूर दबून ठार; 11 लोक गंभीर जखमी

Chhatrapati Sambhajinagar Accident News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी आहे. कन्नड-पिशोर रस्त्यावर उसाच्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.

या अपघातात उसाच्या ट्रक खाली 17 मजूर दबले असल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झालाय, तर 11 जण जखमी असल्याची माहिती पुढे आली आहे. रात्री 12 ते 1 च्या दरम्यान ही घटना घडली.

Sambhajinagar Accident News

17 मजूर ऊसाच्या मोळ्यांखाली दबले

मिळालेल्या माहितीनुसार, उसाने भरलेल्या ट्रकवर 17 मजूर बसून चालले होते. त्यावेळी अचानक ट्रक पलटी झाला आणि त्यामूळे मजूर उसाखाली दबले. मात्र मध्यरात्रीची वेळ असल्याने आणि वर्दळ कमी असल्याने वेळीच मदत मिळू शकली नाही.

किंबहूना उपस्थित लोकांनी या मजुरांना बाहेर काढत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. त्यातील 11 मजुरांना वाचवण्यात यश आले. मात्र दुर्देवाने यात 6 मजूर ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे. सद्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मृत झालेल्यांची नावे?

किसन धन्नू राठोड, मनोज नामदेव चव्हाण, विनोद नामदेव चव्हाण, मिथुन महारू चव्हाण, कृष्णा मुलचंद राठोड (सर्व रा. सातकुंड) व ज्ञानेश्वर देविदास चव्हाण (रा. बेलखेडा ह. मु. सातकुंड ता. कन्नड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तिचे नाव असल्याचे समजतंय.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+