सलमानने रद्द केले बिग बाॅसचे शुटींग! बंगल्याबाहेर सुरक्षाही वाढवली! बाबा सिद्दीकींवर आज अंत्यसंस्कार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानने 'बिग बॉस 18' चे शूट मध्यंतरीच रद्द केले आणि त्याने मुंबईच्या लीलावती रुग्णालयात धाव घेतली. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी मुंबईत गोळ्या झाडल्या गेल्या आणि उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सलमान आणि इतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांचे जवळचे मित्र होते.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा संबंध बिष्णोई गँगशी लावला जात आहे. ते सलमान खान याचे जवळचे मित्र होते आणि सलमान खानला बिष्णोई गँगने यापुर्वी अनेकदा धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे भाईजानच्या बंगल्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यासंदर्भात एनआयने वृत्त दिले आहे.

शासकीय इतमामात अंत्यसंस्काराच्या CM शिंदेंच्या सुचना
बाबा सिद्दीकी यांच्यावर आज रात्री अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसस्कार करण्याच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या आहेत.
बाबा सिद्दिकी यांच्यावर आज रात्री 8.30 वाजता अंत्यसंस्कार
दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्यावर मुस्लीम धर्मानुसार अंत्यसंस्कार होणार आहेत. बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव मारिन लाईन येथील बडा कब्रस्तान येथे आणले जाईल. रात्री 8.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर दफनविधी होईल. यापूर्वी बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव बांद्रा येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी तसेच राजकीय नेते येण्याची शक्यता आहे. मुस्लीम धर्मानुसार बाबा सिद्दिकी यांच्यासाठी नमाज ए जनाजा म्हणजे शेवटची प्रार्थना करण्यात येणार आहे. ही प्रार्थना रात्री 7 वाजता त्यांच्या मकबा हाईट या राहत्या घरी होईल. त्यानंतर त्यांचा बडा कब्रस्तान येथे दफनविधी होईल.












Click it and Unblock the Notifications