Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लोकसभेच्या 50 हजारांवर लीडमुळे विधानसभेलाही काँग्रेसचं पारडं जड, मंजुळा गावीत यांना आव्हान!

Sakri Assembly Election 2024 : महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. जागावाटप आणि उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघ हा उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. अपक्ष निवडून आलेल्या मंजुळा गावित यांनी एकनाथ शिंदे गटाची वाट धरली, त्यामुळे धुळे जिल्ह्यातील हा महत्त्वाचा मतदारसंघाची समीकरणे कमालीची बदलत आहेत.

साक्री विधानसभा मतदारसंघ हा नंदुरबार लोकसभा मतदारसंघात येतो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांना साक्री विधानसभा मतदारसंघातून जवळपास 55 हजारांचा लीड मिळाला आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसच्या उमेदवाराचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. विद्यमान आमदार मंजुळा गावित यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्याचे जवळपास निश्चित आहे.

Sakri Assembly Election 2024

मंजुळा गावित यांना काँग्रेसचे मोठे आव्हान

मंजुळा गावित यांना काँग्रेसचे मोठे आव्हान यंदा राहणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून माजी खासदार बापू चौरे यांचे चिरंजीव प्रवीण चौरे यांचे नाव आघाडीवर आहे. लोकसभेला मिळालेल्या मोठ्या आघाडीमुळे या मतदारसंघात काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे.

2019 ची स्थिती काय?

2019 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार मंजुळा गावित यांना 76 हजार 166, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मोहन सूर्यवंशी यांना 68 हजार 901 तर काँग्रेसचे उमेदवार धनाजी अहिरे यांना 25 हजार 302 इतकी मतं मिळाली होती. यंदा मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे काँग्रेससाठी मतदारसंघात सकारात्मक गोष्टी घडतील असे आडाखे राजकीय विश्लेषकांनी बांधले आहेत.

Take a Poll

मतदारसंघातील स्थिती काय?

'वनइंडिया मराठी'ने केलेल्या ग्राऊंड रिपोर्टनुसार मतदारसंघातील अनेक समस्यांवर काम होणे बाकी असल्याची भावना नागरिकांनी 'वनइंडिया'सोबत बोलताना व्यक्त केली. मतदारसंघातील अनेक नागरिक आमदार मंजुळा गावित यांच्या कामगिरीवर समाधानी नसल्याचे नागरिकांच्या प्रतिक्रियांमधून समोर आले आहे. तसेच मंजुळा गावित यांनी एकनाथ शिंदे गटाची वाट धरल्याचाही फटका त्यांना बसू शकतो अशी जाणकारांची मतं आहेत.

maharashtra assembly election 2024

लोकसभेचा निकाल काँग्रेससाठी बूस्टर

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार हिना गावित यांचा मोठ्या फरकाने पराभव करत गोवाल पाडवी यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. साक्री मतदारसंघातही मतदारांनी काँग्रेसला भरभरून मतदान केले. यंदाच्या निवडणुकीत नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पसंती दिल्याचे निदर्शनास आले.

लोकसभा निवडणुकीत धुळे आणि नंदुरबार अशा दोन्ही लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याने या दोन्ही जिल्ह्यातील सर्व विधानसभा जिंकण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नात असल्याचे चित्र आहे. पण त्यांचे मनसुबे किती पुर्ण होणार हे येत्या निवडणुकीत स्पष्ट होईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+