Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सैफअली खानची कशी आहे प्रकृती? हल्ल्यानंतर बेकायदेशीर बांगलादेशींवर कारवाई; 25 जणांना अटक

Saif Ali Khan : अभिनेता सैफअली खान याच्यावरील हल्ल्यातील आरोपी हा बांग्लादेशी संशयित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच आधीच सुरु असलेली बांग्लादेशी नागरिकांवरील कारवाई आता आणखी तीव्र केली जाणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.

डिसेंबर 2024 पासून ठाणे शहर पोलिसांनी संपूर्ण पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळातील 35 पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात भारतात बेकायदेशीरपणे घुसखोरी करुन वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशींवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

Saif Ali Khan

या कारवाईमध्ये स्थानिक पोलिसांसह ठाणे गुन्हे शाखेने वेगवेगळया कारवाईमध्ये 25 पेक्षा अधिक बांग्लादेशींची धरपकड केली आहे. आता ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. त्यासाठी बांधकामांच्या ठिकाणांसह मजूरांच्या वस्तीच्या भागात कोम्बिंग ऑपरेशन केले जाणार आहे. यासाठी मजूर कॅम्प, मजूरांचे घोळके अशा ठिकाणी अचानक तपासणी करुन त्यांच्या अधिकृत वास्तव्याची माहिती घेतली जाणार आहे. अशा बांग्लादेशींच्या संशयास्पद हालचाली, त्यांची माहिती मिळाल्यावर त्याठिकाणी पारपत्र कायद्याखाली कारवाई केली जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.

ठाण्यात मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेला सैफ अली खान याच्यावरील हल्लेखोर हा देखिल बांग्लादेशी असल्याची माहिती समोर आल्याने मुंबई आणि ठाण्यातील बांग्लादेशींच्या बेकायदेशीर वास्तव्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळेच आता त्यांच्यावर कारवाईची मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे.

सैफ अली खानची प्रकृती कशी आहे? सोहाने दिले अपडेट

सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील फ्लॅटमध्ये हल्ला झाल्यानंतर, त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. सोहा अली खानने रविवारी सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. अभिनेत्रीने सांगितले की, सैफ आता बरा होत आहे. या हल्ल्यानंतर अभिनेता सैफ अली खानवर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रविवारी सैफच्या तब्येतीच्या अपडेटचा संदर्भ देताना सोहा अली खान म्हणाली, "आम्ही खूप आनंदी आहोत की सैफ झपाट्याने बरा होत आहे. आम्ही नशीबवान आहोत आणि कृतज्ञ आहोत की ज्याने आपल्या भावासाठी प्रार्थना केली, त्या सर्वांचे आभार,"

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+