VIDEO : रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झाप झाप झापलं, नेमकं काय घडलं?
विधानभवन परिसरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमधील वाद विकोपाला गेला. पडळकर समर्थकांनी आव्हाड समर्थकांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला, ज्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर वेगाने पसरला. या घटनेनंतर रात्री उशिरा पोलिसांनी आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना अटक केली, त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली.

नेमके काय घडले?
या अटकेच्या निषेधार्थ आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे दोघेही मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे रोहित पवार आणि एका पोलीस अधिकाऱ्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. एका पोलीस अधिकाऱ्याने हातवारे करत बोलणे सुरू केल्याने पवार संतापले. त्यांनी मोठ्या आवाजात त्या अधिकाऱ्याला झापले, "हातवारे करू नका... आवाज खाली ठेवा... शहाणपण शिकवू नका... बोलता येत नसेल तर बोलू नका, कळलं का?" यावेळी रोहित पवारांचे समर्थकही आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांना "साहेबांना हात लावायचा नाही," असा इशारा दिला. यावेळी जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते.
आव्हाड आणि काही कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर पोलीस ठाण्यातील तणाव काही प्रमाणात निवळला. मात्र, या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये रोहित पवार एका पोलीस अधिकाऱ्यावर तीव्र शब्दात संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
पोलिस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसालाच.... चला निघा इथून बाहेर...
— यदुनाथ जवळकर🔥 (@yadujavalkar) July 18, 2025
शेवटचा डायलॉग ऐका...
"तू एक साधा पीएसआय...."
पीएसआय होयला किती अभ्यास करावा लागतो हे आजोबांच्या जीवावर निवडून आलेल्या माणसाला काय समजणार?@Dev_Fadnavis पोलिस स्टेन मधे जाऊन पोलिसांचा दमबाजी करणाऱ्या रोहित पवार… pic.twitter.com/3sjDSvK7vN
रात्रीच्या घटनेचा तपशील
गुरुवारी दुपारी विधानभवन परिसरात पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या कार्यकर्त्याला मारहाण केली. या घटनेचे पडसाद रात्रभर उमटले. मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना विधानभवन परिसरातून ताब्यात घेतले. ही बातमी जितेंद्र आव्हाड यांना कळताच ते तातडीने विधानभवनात पोहोचले आणि कार्यकर्त्यांसह पोलिसांच्या गाडीसमोर धरणे आंदोलन केले. यात रोहित पवारही सहभागी झाले होते. आव्हाड आपल्या भूमिकेवर ठाम असताना, रात्री दीड वाजता पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली. पोलिसांनी आव्हाडांना बाजूला सारत नितीन देशमुख यांना पोलीस ठाण्याकडे नेले.












Click it and Unblock the Notifications