Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Pune Rave Party: 252 Video, 1497 नग्न फोटो, खडसेंच्या जावयांचे मानवी तस्करीचे 'रॅकेट' उघडकीस?

Pune Rave Party : पुणे शहरातील एका रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा पती प्रांजल खेवलकर यांच्यावर आता अत्यंत गंभीर आरोप झाले आहेत. या घटनेची व्याप्ती केवळ एका पार्टीपुरती मर्यादित नसून, ती मानवी तस्करीच्या एका मोठ्या रॅकेटकडे बोट दाखवत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक माहिती दिली.

अहवालातील खळबळजनक तपशील!

पुणे पोलिसांना दिलेल्या सूचनांनुसार, सानवी संस्थेने या प्रकरणाचा अहवाल महिला आयोगाकडे सादर केला आहे. हा अहवाल अतिशय भयावह असून, त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

खराडी येथील फ्लॅटवर छापा टाकून पोलिसांनी प्रांजल खेवलकर आणि त्याच्या साथीदारांना अटक केली होती. त्यावेळी त्यांच्याकडून अमली पदार्थांसह 10 मोबाईल जप्त करण्यात आले होते.

या मोबाईलच्या 'हिडन फोल्डर'मध्ये 252 व्हिडिओ आणि 1497 नग्न फोटो आढळून आले आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ 'आरुष' नावाच्या एका नंबरखाली सेव्ह केले होते.

Pune Rave Party

चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने फसवणूक

चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रांजल खेवलकर मुलींना चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून त्यांना लोणावळा, गोवा, साकीनाका आणि जळगाव यांसारख्या ठिकाणी बोलावले जायचे. त्यानंतर त्यांना नशेत विवस्त्र करून त्यांचे घाणेरडे व्हिडिओ आणि फोटो काढले जात होते.

इतकेच नाही, तर साफसफाई करणाऱ्या मोलकरणींचेही फोटो आणि व्हिडिओ काढल्याचे समोर आले आहे. या प्रकारातून या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले असून, यामुळे हे एक मानवी तस्करीचे रॅकेट असण्याची शक्यता चाकणकर यांनी व्यक्त केली आहे.

मोठी मानवी तस्करी?

या प्रकरणात महिला आयोगाने पोलिसांना सखोल चौकशीचे निर्देश दिले आहेत. चाकणकर यांनी या प्रकरणाला देशातील सर्वात मोठे मानवी तस्करीचे रॅकेट म्हटले आहे. गरिबीमुळे आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या मुलींना हे रॅकेट लक्ष्य करत होते.

रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची पुढील चौकशी करण्यासाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्याची मागणी केली आहे. तसेच, त्यांनी पीडित मुलींना पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचे आवाहनही केले आहे.

अनेक वर्षांपासून सुरू असलेले हे रॅकेट उघडकीस आल्याने, या प्रकरणाची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे, असे मत चाकणकर यांनी व्यक्त केले. या प्रकरणात खेवलकर स्वतः अनेक व्हिडिओमध्ये दिसत असल्याने, या प्रकरणातील त्याची भूमिका स्पष्ट होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+