मराठा समाजासाठी आता रितेश देशमुख मैदानात, पोस्ट करून म्हणाला...
अभिनेता रितेश देशमुख याने मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सोशल मीडियावरुन पाठिंबा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनासंदर्भात रितेशने एका पोस्टद्वारे आपली भावना व्यक्त केली.

रितेश देशमुखने त्याच्या 'X' (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर पोस्टमध्ये लिहिले, "सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील अशी मनःपूर्वक आशा आहे."
रितेश देशमुखची जरांगेंसाठी प्रार्थना
मनोज जरांगे पाटील उपोषणावर बसल्यामुळे त्यांच्या तब्येतीची चिंता रितेशने व्यक्त केली. "श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत, त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे," असे रितेश म्हणाला. यासोबत त्याने 'जय शिवराय, जय महाराष्ट्र' असेही लिहिले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातून लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. सध्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.












Click it and Unblock the Notifications