क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं! बॅडमिंंटन खेळता खेळता निवृत्त PSI कोसळले अन् जाग्यावरच गेला जीव..
Retired PSI dies of heart attack on the spot Bhandara News : माणसाच्या आयुष्याचा काहीही भरोसा नाही, असे आपण म्हणत असतो. एव्हाना समाजात वावरत असताना आपणास अशा अनेक घटना देखील पाहायला मिळतात. अशीच थरारक घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. काही दिवसांपूर्वीच या पोलिस अधिकाऱ्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झाला, आणि ते सुखी जीवन जगत असताना त्यांना अखेर काळाने ओढावून नेले.
नेमकं काय घडलं?
भंडारा शहरात बॅडमिंटन खेळत असताना सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं बॅडमिंटन कोर्टवरच मृत्यू झाला. भंडारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा स्टेडियमवर ही घटना घडली. त्यानंतर, तातडीनं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तिथे नेल्यानंतर डॉक्टरांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यास मृत घोषित केले.

कोणी काळ येईल कैसा,...
बाजीराव चिंधालोरे (60) असं मृत सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकांचं नावं आहे. विशेष म्हणजे नुकतेच त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा पार पडला होता. सेवानिवृत्तीनंतर ते आपल्याला व्यस्त करण्यासाठी बॅडमिंटन कोर्टवर यायला लागले. या ठिकाणी ते बॅडमिंटन खेळायचे. मात्र, आज अचानक खेळता-खेळता ते खाली कोसळले आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने स्टेडियमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यामुळे नाही क्षणाचा भरोसा, कोणी काळ येईल कैसा, याची प्रचिती या घटनेतून पाहायला मिळाली आहे.
सेवानिवृत्तीचे जीवन जगता आलेच नाही
मिळालेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त पीएसआय बाजीराव चिंधालोरे यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वीच झाला होता. त्यामुळे ते नित्य मैदानावर बॅडमिंटन कोर्टवर येत असत. आज देखील ते नेहमीप्रमाणे खेळण्यासाठी आले, खेळ देखील सुरू झाला परंतु, काही वेळातच ते खाली कोसळले ते पुन्हा उठलेच नाही, अशी माहिती सोबत असलेल्या लोकांनी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा जीव गेल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.












Click it and Unblock the Notifications