मोठी बातमी! फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ; पहा नेमकं काय घडलं...
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. सर्वच पक्षाचे नेते सध्या प्रचारात गुंतले असताना महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा अचानक वाढविण्यात आली आहे. त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय सुरक्षा यंत्रणांनी घेतला आहे. फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत फोर्स वनचे चार अत्याधुनिक शस्त्रधारी कमांडो तैनात करण्यात येणार आहेत.
'या'मुळे वाढवली फडणवीसांची सुरक्षा
एसआयडीने दिलेल्या गोपनीय अहवालानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या जीवाला धोका असल्याने त्यांची सुरक्षा वाढवण्यात आल्याची, माहिती काही मिडिया हाऊसने दिली. देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. भाजपच्या प्रचाराची जबाबदारी ही उपूमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. या धामधुमीत त्यांच्या जीवाला धोका असल्याची गोपनिय माहिती, सुरक्षा यंत्रणांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. फडणवीस यांना सध्या झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यातही आता वाढ करण्यात आली आहे.

नेमकी कशी असेल सुरक्षा व्यवस्था
फडणवीसांना यापूर्वी झेड प्लस सुरक्षा होती. आता फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठा फेरबदल करण्यात आला आहे. सध्या फोर्स १ मधील अत्याधुनिक शस्त्रधारी असलेले ४ कमांडो फडणवीस यांच्या सुरक्षेत तैनात करण्यात येणार आहे. तर एकूण १८ जवान त्यांच्या सुरक्षा यंत्रणेत वाढवण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती एसआयडीच्या गोपनीय अहवालात पुढे आली आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतही झाली वाढ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची काही दिवसांपूर्वी गोळीबार करत हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई गँगने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर देखील सुरक्षा वाढवण्यात आली होती. तसेच अनेक वरिष्ठ नेत्यांनाही सावध राहण्याचा इशारा देण्यात आला होता.












Click it and Unblock the Notifications