Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नका: थेट लोकसभेच्या सरचिटणीसांकडे नोटीस

Mumabi: उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून निवडून आलेल्या रवींद्र वायकर यांच्या अडचणी काही थांबायच नाव घेत नाहीये. लोकसभेत त्यांनी मिळवलेल्या विजयावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे त्यांचा विजय संशयाच्या फेऱ्यात अडकला आहे.यातच आत रवींद्र वायकर यांना लोकसभेत खासदार म्हणून शपथ देऊ नये अशी मागणी पुढे आलेली आहे.

पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढलेले हिंदू समाज पार्टीचे उमेदवार भरत शाह यांनी ही मागणी केली आहे. वकील असीम सरोदे यांच्यामार्फत भरत शाह यांनी थेट लोकसभा सरचिटणीस उत्पलकुमार सिंग यांना नोटीस पाठवली आहे. इमेलद्वारे नोटीस पाठवल्याचे ॲड.असीम सरोदे यांनी सांगितले.

ravindra waikar

काय आहे नोटीस?

नोटीसीत नमूद करण्यात आले आहे की, भारतात पहिल्यांदा ईव्हीएम मशीन मतमोजणी बाबत एफआयर दाखल झाला आहे. त्यामुळे रवींद्र वायकर यांना आर्टिकल 99 नुसार खासदारकीची शपथ देणे म्हणजे संविधान प्रक्रिया अपवित्र करण्याची परवानगी देणे ठरेल.

अशी मागणी यापूर्वी कुणी केली नसेल तरीही आपण शपथ देण्यामागील संविधानाचा उद्देश लक्षात घेऊन सकारात्मक कृती म्हणून रवींद्र वायकर यांना खासदारकीची शपथ देऊ नये असं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
या नोटीसीमध्ये उमेदवाराच्या नातेवाईंकाच्या उपस्थिताचाही उल्लेख करण्यात आला आहे.

उमेदवाराचे नातेवाईक मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल घेऊन हजर होते असा आरोप झाल्यावर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. ईव्हीएमद्वारे होणाऱ्या मतदान व मतमोजणी प्रक्रियेत ठरवून व काही निवडक मतदारसंघात गैरवापर करायचा.

त्यासाठी काही सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरायचे आणि भाजपला सोयीचा निकाल येण्याची व्यवस्था करायची अशी चर्चा अनेकदा होत असतांना यावेळी प्रथमच अश्याच संदर्भात एफआयआर दाखल झालेला आहे'', असे सुद्धा या नोटीसमध्ये नमूद करण्यात आला आहे.

यंत्रणांवर एकनाथ शिंदेंचा दबाव

दरम्यान, मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातील संबंधित मतमोजणी केंद्रावरील सिसिटीव्ही फुटेज देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. सरकारी यंत्रणा सत्य लपवण्यासाठी रवींद्र वायकर यांना एकनाथ शिंदे व केंद्र सरकारच्या दबावाखाली मदत करत आहे असेही भरत खिमजी शाह यांनी या नोटीसीत नमूद केले आहे.

वायकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

विशेष म्हणजे निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गांचा वापर करण्याच्या या उघड प्रकरणी दाद मागण्यासाठी भरत खिमजी शाह यांनी हाय कोर्टात जाऊन इलेक्शन पिटिशन दाखल करणार असल्याचे सुद्धा जाहीर केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+