Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

"मी मुरलीधर मोहोळांना जिलेबी भरवणार!" एकनाथ शिंदेंशी भेट होताच रविंद्र धंगेकरांचं मोठं विधान

Ravindra dhangekar jalebi muralidhar mohol : पुण्यातील गाजलेल्या जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेचा व्यवहाराचा वाद राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे, कारण महायुती सरकारमधील शिवसेनेचे नेते रविंद्र धंगेकर यांनी मित्रपक्ष भाजपचेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याविरुद्ध आरोपाच्या फैरी झाडल्या. त्यानंतर रविंद्र धंगेकर यांनी स्वःपक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर त्यांचे भाष्य खूपच चर्चेत आले आहे.

मी मुरलीधर मोहळांसह सर्वांना जिलेबी भरवणार असल्याचे वक्तव्य रविंद्र धंगेकर यंनी व्यक्त केले. जैन बोर्डिींग ट्रस्टच्या जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे हे वक्तव्य आले आहे.

Ravindra dhangekar jalebi muralidhar mohol

जैन बोर्डींग ट्रस्टच्या जागेच्या व्यवहारावरुन भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर सातत्याने आरोप करणारे शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी आता आनंद व्यक्त केला आहे. 'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला होता आणि तो खरा ठरला,' असे म्हणत धंगेकर यांनी आता मुरलीधर मोहोळांसह सर्वांना जिलेबी भरवण्याची घोषणा केली आहे.

जैन बोर्डिंग जागेचा व्यवहार रद्द

पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट आणि बिल्डर विशाल गोखले यांच्यातील जागेचा व्यवहार रद्द झाला आहे. बिल्डर विशाल गोखले यांनी याबाबतचा निर्णय ई-मेलद्वारे जैन ट्रस्टला कळवला आहे. या व्यवहारावरून पुण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते आणि मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप झाले होते.

रवींद्र धंगेकरांचे मोठे विधान: "शिंदेंनी दिलेला शब्द खरा ठरला"

व्यवहार रद्द झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना मोठा आनंद व्यक्त केला. त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि मुरलीधर मोहोळ यांच्यावर केलेले आरोप मागे घेण्याची तयारी दर्शवली.

Take a Poll

जिलेबी भरवणार - धंगेकर

"मी दोन दिवसांत व्यवहार रद्द झाल्यास मुरलीधर मोहोळ यांच्यासह सगळ्यांना जिलेबी भरवणार असे बोललो होतो. आता तसे झाले आहे, त्यामुळे मी माझा शब्द पाळेन." धंगेकर पुढे म्हणाले, "पुढील दोन दिवस मी मुरलीधर मोहोळ यांच्याबद्दल काहीही बोलणार नाही. एकनाथ शिंदे यांनी सांगितले की दोन दिवसांत तोडगा निघेल, आणि दोन दिवसांच्या आतच व्यवहार रद्द झाला. त्यामुळे शिंदे साहेबांनी दिलेला शब्द खरा ठरला आहे, याचा मला आनंद आहे."

नेमके काय होते जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरण?

पुणे शहर मध्य भागात असलेल्या जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेचा व्यवहार एका बिल्डरसोबत झाल्यामुळे हा वाद सुरू झाला होता. या व्यवहारात भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा सहभाग असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता. मोहोळ यांनी ही जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आणि ट्रस्टच्या मालमत्तेवर डोळा ठेवल्याचा धंगेकर यांचा दावा होता.

मुरलीधर मोहोळांचा खुलासा

मुरलीधर मोहोळ यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. माझा या व्यवहाराशी कोणताही संबंध नाही, असे त्यांनी वारंवार स्पष्ट केले होते.

एकनाथ शिंदे यांचा हस्तक्षेप

हा वाद राजकीय दृष्ट्या वाढल्यानंतर आणि धंगेकर यांनी थेट आरोपांची मालिका सुरू केल्यानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात लक्ष घातले होते आणि तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+