Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ratan Tata : रतन टाटांनी त्यांच्या लाडक्या श्वानासाठी नाकारलं होतं प्रिन्स चार्ल्स यांचं आमंत्रण!

रतन टाटा यांचं प्राण्यांवरचं प्रेम जगजाहीर आहे. या अब्जाधीश उद्योगपतीने मुंबईमध्ये पाळीव प्राण्यांसाठीचं मोठं हाॅस्पिटलही सुरू केलं आहे. पण तुम्हाला माहितीय का ? रतन टाटा यांनी आपल्या कुत्र्यासाठी ब्रिटनच्या राजघराण्याचं आमंत्रणही नाकारलं होतं.

प्रिन्स चार्ल्स हे रतन टाटा यांच्या कतृत्वाने खूप प्रभावित झाले होते. त्यांना रतन टाटा यांचा बकिंगहॅम पॅलेसमध्ये सन्मान करायचा होता. त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करायचं होतं. पण रतन टाटा यांनी या शाही कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास नकार दिला. त्याचं कारण होतं टँगो आणि टिटो हे त्यांचे दोन आप्त! रतन टाटा यांच्यासोबत राहणाऱ्या या दोन्ही श्वानांची तब्येत बरी नव्हती. हे दोघेही गंभीररित्या आजारी होते आणि अशा स्थितीत रतन टाटा त्यांना सोडून लंडनला जाऊ शकत नव्हते. स्तंभलेखक सोहेल सेठ यांनी त्यांच्या एका लेखामध्ये रतन टाटा यांची ही आठवण सांगितली आहे.

RATAN TATA

2023 मध्येही रतन टाटा यांचं हे श्वानप्रेम सगळ्यांना कळून चुकलं. त्यांनी इस्टाग्राम वर एक पोस्ट लिहिली होती. 'माझ्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना मुंबईतल्या सायन हाॅस्पिटलजळ एक श्वान मिळाला आहे. या कुत्र्याच्या मालकाने त्याला सोडून दिलं आहे आणि आता त्याच्यावर आम्ही उपचार केले आहेत. पण या कुत्र्याच्या खऱ्या मालकाने पुढे यावं किंवा कुणाला काही माहिती असेल तर त्याने सांगावं. म्हणजे त्याचा सांभाळ नीट पद्धतीने होऊ शकेल.

रतन टाटा एवढं आवाहन करून थांबले नाहीत तर त्यासाठी [email protected] असा ई मेलचा पत्ताही त्यांनी दिला होता. 'जो कोणी त्याचा सांभाळ करणारा आहे त्याने पुढे यावं आणि आपणच त्याचा सांभाळकर्ता असल्याचा पुरावा द्यावा. तोपर्यंत या श्वानाचा सांभाळ आम्ही करू', असंही रतन टाटा यांनी लिहिलं होतं.

'माझ्या श्वानाच्या एका आॅपरेशनसाठी मला अमेरिकेला जावं लागलं होतं. त्यामुळे भारतात प्राण्यांसाठीचं एक अद्ययावत हाॅस्पिटल असावं असं मला प्रकर्षाने वाटू लागलं. म्हणूनच मी मुंबईत प्राण्यासांठीचं हाॅस्पिटल सुरू करायचं ठरवलं.', असंही रतन टाटा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

RATAN TATA

रतन टाटा यांची उद्योगविश्वातली कारकीर्द चांगलीच गाजली. पण त्याबरोबरच त्यांचं हे श्वानप्रेम आणि त्यांनी सुरू केलेलं प्राण्यांचं हाॅस्पिटल हा सुद्धा त्यांनी जगाला दिलेला एक मोठा वारसा आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+