तिरुपतीनंतर मुंबईत खळबळ, सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उंदराचा वावर?, ट्रस्टींनी आरोप फेटाळले
Siddhivinayak Temple Prasad : गेल्या काही दिवसांपासून देशात तिरुपती बालाजीच्या मंदिरात चरबीयुक्त लाडूचे वाटप झाल्याचा आरोप झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर सर्वत्र टीका केली जाऊ लागली. हा विषय थोडा मागे जातो की नाही तोच आता मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादामध्ये उंदीर आढळ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. परंतु, मंदिर प्रशासनाच्या वतीने हे सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील प्रभादेवी परिसरात असलेल्या सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उंदीर आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे तिरुपती बालाजीच्या प्रसादातील कथित भेसळीनंतर सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उंदीर आढळ्याच्या दाव्यामुळे भाविकांमध्ये चिंता वाढलेली आहे.

काय दिसते व्हायरल व्हिडिओ?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रसादाची पाकिटे भरुन ठेवलेल्या कॅरेटमध्ये एका कोपऱ्यात प्लास्टीक पिशवीवर काही उंदीर असल्याचे दिसत आहेत. दरम्यान, हा व्हिडिओ फेक असल्याचा दावा मंदिर समितीच्या वतीने करण्यात येत आहेत.
BREAKING: Video shows mice over prasad at Mumbai's Shree Siddhivinayak Temple. #SiddhivinayakTemple pic.twitter.com/Hx8BJw22vh
— Vani Mehrotra (@vani_mehrotra) September 24, 2024
सरवणकरांनी केला आरोप
हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर माहीमचे शिवसेनेचे आमदार आणि सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी आरोप नाकारले आहेत. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो आणि व्हिडिओ खोटे आहेत. कारण आम्ही आतापर्यंत कायम स्वच्छतेला प्राधान्य दिलेले आहे. आमचा परिसर स्वच्छ असतो. जिथे प्रसाद करतो तिथे स्वच्छता असते. सर्व प्रसादाचे पॅकिंग हे मशिनीवर होते. त्यामुळे असा प्रकार घडणे शक्य नाही. याबाबत आम्ही चौकशी केली असून, यात काहीही तथ्य नाही.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications