देशातील पहिले 'आधार' मिळवणाऱ्या महिलेला नाही मिळाला लाडक्या बहीण योजनेचा लाभ, नेमकं घोडं कुठं आडलंय
Majhi Ladki Bahin Yojna Latest News : महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या वतीने चालू केलेली महत्त्वकांक्षी लाडकी बहीण योजना ही घराघरात पोहोचली आहे. त्यामुळेच की काय महायुती सरकारला 2024 च्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश देखील मिळाले.
दरम्यान, सरकारच्या वतीने आता नियमांवर बोट ठेवून या योजनेतील लाभार्थी महिलांचे नावे काढण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्रातील ज्या महिलेला देशातील पहिले आधार कार्ड मिळण्याचा बहुमान मिळाला, जिचा देशभरात गाजावाजा झाला, त्याच महिलेला सद्या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसल्याचे धक्कादायक बातमी समोर आली आहे.

पहिले 'आधार' मिळवणारी महिला कोण आहे?
महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील टेंभळी गावातील रंजना सोनवणे यांच्या घराच्या भिंतीवर एक फोटो आहे. या फोटोमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हे देखील आहे. हा फोटो 29 सप्टेंबर 2010 रोजी काढण्यात आला होता. हा तो दिवस होता जेव्हा सरकारने आधार कार्ड देण्यास सुरुवात केली. भारतातील लोकांपर्यंत कल्याणकारी योजना पोहोचवण्यात हा एक मोठा बदल असल्याचे सरकारने म्हटले होते. पण या कार्डची पहिली लाभार्थी असलेल्या रंजना सोनवणे यांना या फोटोतून केवळ पंधरा मिनिट प्रसिद्धी मिळाल्याचा तेवढा लाभ झाला. पण, राज्यसरकारकडून सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ काही मिळाला नसल्याचे समोर आले आहे. त्याची गोष्टच वेगळी असल्याचे देखील समोर आले आहे.
नेमकं घोडं कुठं अडकलंय?
महाराष्ट्रातील 21-65 वयोगटातील 2 कोटींहून अधिक महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला दीड हजारांचा लाभ घेण्यात पात्र आहेत. ही योजना महायुती सरकारच्या कल्याणकारी अजेंड्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात जमा केले जातात. रंजना सोनवणे यांचे आधार कार्ड एका बँक खात्याशी जोडलेले आहे. पण हे त्याचे खाते नाही. त्यामुळे, सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्या खात्यात जमा होणारे पैसेतिला मिळू शकत नाहीत.
रंजना सोनवणे काय म्हणाल्या?
रंजना सोनवणे यांनी एका मीडियाशी बोलताना सांगितले की, माझ्या आधार कार्डला दुसरे खाते जोडलेले आहे. जे खाते माझे नाही. दुसऱ्या कोणाच्या तरी खाजगी बँकेत असलेल्या खात्याशी ते आधार जोडलेले आहे. जेव्हा मी तपासणी करायला जाते, तेव्हा अधिकारी मला कागदपत्रे दाखवतात की माझे पैसे पाठवले गेले आहेत, पण मला ते कधीच मिळत नाहीत. ती म्हणते की मला देशात पहिले आधार मिळाल्याचा आनंद आहे, परंतु, आधाराच्या मदतीने मिळणाऱ्या कल्याणकारी योजनेचा लाभ मिळत नसल्याचे देखील खंत आहे. मला वाटले की माझे आयुष्य बदलेल आणि सरकारी योजना माझ्यापर्यंत पोहोचेल. पण सरकारने मला आधार दिला, पण आता त्याचा मला काही उपयोग होत नाही, अशी नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली.
कुटुंबाचे परिस्थितीत बेताचीच?
रंजना सोनवणे यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 40,000 रुपये आहे. तीन मुले आहेत. तिचा पती सदाशिव सोनवणे हे खेळणी विकून पैसे कमावतात. परंतु, परिस्थिती बेताची असल्याने रंजना या रोजंदारीवर काम करतात. तीन मुलांपैकी एक मुलगा खासगी कंपनीत कमी पगारावर काम करतोय. तर अन्य दोन्ही मुले शिक्षण घेत आहेत. लाडकी बहीण योजनेत पैसे मिळत नसल्याने रंजना यांनी सुमारे सात ते आठ वेळा तालुका कार्यालयात जाऊन भेट दिली. पण किती वेळा भेट देणार आधारला माझे खातेच जोडलेले दिसत नाही, मग मला आधारचा नेमका फायदा तरी काय, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.












Click it and Unblock the Notifications