Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'अनिल परब तुझी औकात काय', बाप दाखवं नाहीतर श्राद्ध घाल, डान्सबार आरोपावरुन रामदास कदम संतापले!

Ramdas Kadam Attacks Anil Parab : शिवसेना विरुद्ध शिवसेना हा वाद सातत्याने महाराष्ट्रात पाहायला मिळतोय. आता ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यातील वाद चांगलाच पेटलेला आहे.

डान्स बारवरुन परब यांनी कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यावर आता योगेश कदम यांचे वडील तथा शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी एंट्री करून अनिल परब यांना इशारा दिलाय, पुरावे दाखव नाहीतर गप्प रहा, तुझी औकात काय आहे, असे म्हणत जोरदार हल्लाबोल चढवला.

अनिल परब यांचा आरोप काय?

मुंबईतील सावली डान्स बार हा गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्रींच्या नावावर असल्याचा गंभीर आरोप अनिल परब यांनी केला होता. त्यानंतर, राजकीय द्वेषापोटी हे आरोप करण्यात आल्याचं योगेश कदम यांनी म्हटलं.

मात्र, अनिल परब यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन डान्सबार हा योगेश कदम यांच्याच मातोश्रींचा असल्याचा आरोप करत लाज कशी वाटत नाही? असा सवालही विचारला होता.

{image-kadamvsparab2-1753185Ramdas Kadam Attacks Anil Parab : 347.jpg marathi.oneindia.com}

रामदास कदम मुलाच्या बचावासाठी, परबांची काढली औकात?

अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपावर आता रामदास कदम यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, अनिल परब यांच्याविरुद्ध दोन दिवसांत हक्कभंग आणणार म्हणजे आणणार, असेही त्यांनी सांगितले. अनिल परबने दादागिरीची भाषा करू नये, मी भीक घालत नाही. हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव, असे आव्हान रामदास कदम यांनी अनिल परब यांना दिलं आहे.

परब म्हणजे अर्धवट वकील...

पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले की, अनिल परब हा अर्धवट वकील आहे, विधिमंडळात मी 32 वर्षे काम केलं आहे, प्रत्येक नियमाची मला माहिती आहे. एखाद्या मंत्र्यावर आरोप करताना 35 ची नोटीस देऊन सभापतींची परवानगी घेऊन आरोप करावे लागतात. तसे न करता योगेश कदम सभागृहात नसताना हे आरोप करण्यात आले आहेत. अनिल परबवर उद्या हक्क भंग होणार आहे. दोन दिवस सुट्टी असल्याने हक्कभंग टाकू शकलो नाही, अशी माहितीही रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

कदम कुटुंब संपविण्याचा ठाकरेंचा डाव!

सभागृहात जो सातबारा दाखवला तो बघायला अनिल परब यांनी त्यांच्या सगळ्या पिढ्या आणाव्यात. बाप दाखव नाहीतर श्रद्धा घाल, असे म्हणत पुरावे सादर करण्याचे चॅलेंज रामदास कदम यांनी अनिल परबांना दिले आहे.

पोलिसांचे नियम पोलिसांना माहिती आहेत, त्यांनी योग्य कारवाई केली. आम्ही डान्सबार सुरू करुन लोकांचे संसार उध्वस्त केले नाहीत. राजकीय मैदानात काही जमलं नाही म्हणून उद्धव ठाकरे आता विधिमंडळात करायला बघत आहेत. उद्धव ठाकरेंनी कदम कुटुंबाला संपवण्याचा विडा उचलला आहे, पण ते कदापि शक्य होणार नाही, असे म्हणत त्यांनी ठाकरेंवर देखील निशाणा साधला.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+