Rajya Sabha Election 2026 : पार्थ पवारांना राज्यसभेवर संधी; महायुतीचे पारडे जड, वाचा सविस्तर गणित
Rajya Sabha Election 2026 Maharashtra Seat Equation : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोठ्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) पार्थ पवार यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षानेही आपल्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी कंबर कसली असून, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र स्पष्ट होत आहे.

राष्ट्रवादीचा मोठा डाव: पार्थ पवार राज्यसभेवर!
सोमवारी रात्री मुंबईत प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या बैठकीला सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते.
भाजप विनोद तावडेंना राज्यसभेवर पाठवणार?
भाजपकडून राज्यसभेचे आपले उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी मंगळवारी रात्री 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
भाजपकडून राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात 4 उमेदवार उतरवले जाणार आहेत. यापैकी एका जागेवर रामदास आठवले यांचे नाव जवळपास निश्चित आहे. तर इतर तीन उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी भाजपच्या आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा होईल. या तीन उमेदवारांमध्ये विनोद तावडे, विजया रहाटकर आणि धैर्यशील पाटील यांच्या नावाचा समावेश आहे.
राज्यसभेच्या 7 रिक्त जागा, निवडून येण्याचं समीकरण काय?
- विधानसभेचे आमदार 286 ; अजित पवार आणि शिवाजी कर्डिलेंच्या निधनाने 2 जागा रिक्त
कोटा = एकूण आमदार (286) भागीले रिक्त जागा 7 + 1 याच्या उत्तरात + 1 मिळवायचे. म्हणजेच = 286 / 8 =35.75 : 35.75 + 1 = 36.75 : राज्यसभेवर निवडून येण्यासाठी उमेदवाराला 36.75 म्हणजेच 37 मते मिळायला हवीत.
कोणाचे संख्याबळ किती?
- भाजपा- 132 - 1 = 131
- शिवसेना (शिंदे गट)- 57
- राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41 - 1 = 40
- काँग्रेस- 16
- राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
- शिवसेना (ठाकरे गट)- 20
- समाजवादी पार्टी- 2
- जनसुराज्य शक्ती- 2
- राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
- राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
- एमआयएम- 1 जागा
- सीपीआय (एम)- 1
- पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
- राजर्षी शाहू विकास आघाडी- 1 (राजेंद्र यड्रावकर)
- अपक्ष- 2 (शिवाजी पाटील आणि शरद सोनावणे)
एकूण गणित कसे?
- महायुती = 131 + 57 + 40 + 2 + 1+1 + 2= 234 (2 आमदारांचं निधन)
- मविआ = 16+10+20+2+1 = 49
- इतर = 03
- एकूण = 286
कुणाचे किती खासदार निवडून येऊ शकतात?
- भाजपकडे 131 + 1 अपक्षाचा पाठिंबा असे 132 आमदार जर एक खासदार निवडण्यासाठी 37 मतांची गरज असेल तर 132/37 = 3.56 म्हणजे एकट्या भाजपचे 3 ते 4 खासदार निवडून येऊ शकतात.
- शिवसेना शिंदे = 57 + 1 अपक्षाचा पाठिंबा असे 58 आमदार जर एक खासदार निवडण्यासाठी 37 मतांची गरज असेल तर 58/37 = 1.56 म्हणजे एकट्या शिंदेसेनेचा 1 खासदार निवडून येऊ शकतो. शिंदेंकडे 20 मते अतिरिक्त असतील.
- राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41 - 1 = 40, जर एक खासदार निवडण्यासाठी 37 मतांची गरज असेल तर 40/37 = 1.08, म्हणजे एकट्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 खासदार निवडून येऊ शकतो. राष्ट्रवादीकडे 3 मते अतिरिक्त असतील.
मविआचे किती खासदार निवडून येऊ शकतात?
- काँग्रेस- 16 +राष्ट्रवादी (शरद पवार गट) 10 + शिवसेना (ठाकरे गट)- 20 = 46
- मविआला पाठिंबा देणारे छोटे पक्ष = सपा 2 + माकप 1 = 3
- मविआकडे 46+3 = 49 आमदारांचं बळ जर एक खासदार निवडण्यासाठी 37 मतांची गरज असेल तर 49/37 = 1.32 म्हणजे मविआमध्ये सर्व पक्षांचा मिळून 1 खासदार निवडून येऊ शकतो. त्याउलट महायुतीमध्ये भाजपचे 3, शिंदेसेनेचा 1 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 आणि अतिरिक्त मतांवरुन 1 असे 6 खासदार आरामात निवडून येतील
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी







Click it and Unblock the Notifications