Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राजकोट पुतळा दुर्घटनेप्रकरणी हा मोठा दावा : फक्त 6 फुटांच्या पुतळ्याला परवानगी; मग उंची वाढली कशी?

मुंबई : मालवन इथं राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेत नाराजी असून यानंतर विरोधकांनीही सरकारवर टीका केली आहे. या सर्व घडामोडी सुरु असतानाच आता एक नवीन दावा समोर आला आहे. पुतळ्याची उंची नियमापेक्षा जास्त वाढवल्याचा दावाही केला जात आहे.

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर देशातील जनतेचं या घटनेविषयी लक्ष लागलं आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर राजकारण तापलेलं असतानाच पुतळ्यावरुन पुन्हा जोरदार शाह-काटशाहंचं राजकारण सुरु आहे. महाविकास आघाडीनं पुतळा कोसळल्याप्रकरणी एक सप्टेंबर रोजी सरकारविरोधात मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे.

Rajkot statue accident case Rajeev Mishra  Director of Art Directorate  claims a big claim

काय आहे दावा?

राज्याच्या कला संचलनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी आपल्या विभागाने राजकोट किल्ल्यावर केवळ 6 फुटांचा पुतळा बसवण्याची परवानगी दिल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात दिव्य मराठीने वृत्त दिलं आहे. राजीव मिश्रा यांच्या या दाव्यामुळे मग या किल्ल्यावरील पुतळ्याची उंची वाढली कशी? असा सवाल उपस्थित होत आहे.

काय म्हणाले राजीव मिश्रा?

कला संचलनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना संबंधित दावा केला आहे. राज्यात कुठेही महापुरुषांचा पुतळा उभा करायाचा असेल तर कला संचालनालयाची परवानगी घ्यावी लागते ते बंधनकारक आहे. जर परवानगी नसेल तर कुणालाही पुतळा उभारता येत नाही. एखादी एजन्सी पुतळा उभारण्याची परवानगी कला संचनालयाकडे मागते, तेव्हा त्यांना संबंधित पुतळ्याचे क्ले -मॉडेल सादर करावे लागते. त्यानंतर कला संचालनालयाची तज्ज्ञ, कला इतिहासकार व कलाकार यांचा समावेश असणआरी समिती क्ले मॉडेलची तपासणी करून परवानगी देत असते.

मगच मिळते परवानगी...

कला संचलनालयाचे तज्ज्ञ तपासणी करतात आणि तपासणीत ज्या महापुरुषाचा पुतळा आहे, त्या पुतळ्याचे हावभाव, देहयष्टी, उंची तपासली जाते. त्यानंतर क्ले मॉडेलला परवानगी दिली जाते. त्यानंतर संबंधित शिल्पकार त्याला पुढे कशाप्रकारे नेतो ही त्यांची जबाबदारी असते.

उंची वाढवल्याचे आम्हाला कळवले नाही

राजीव मिश्रा पुढे बोलताना म्हणाले की, रोजकोट किल्ल्यावरील पुतळ्याच्या संदर्भात शिल्पकाराने 6 फुटांचे क्ले मॉडेल सादर केले होते. तेव्हा आम्ही फक्त 6 फुटांच्या क्ले मॉडेलला मंजुरी दिल्याची बाब नौदलाला कळवली. पण त्यानंतर या पुतळ्याची उंची वाढवली गेल्याची कोणतीही माहिती आम्हाला दिली गेली नाही. पुतळ्याच्या स्ट्रक्चरमध्ये स्टेनलेस स्टिलचा वापर होणार असल्याची कल्पनाही आम्हाला देण्यात आली नाही. पुतळ्याच्या चौथऱ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तुविशारदाची परवानगी घ्यावी लागले.

सहा फूट उंचीसाठी परवानगी

राजीव मिश्रा यांच्या या स्पष्टोक्तीमुळे कला संचालनालयाने राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याची उंची केवळ 6 फूट निश्चित केली परंतु, या पुतळ्याची उंची कशी वाढली? त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नावर राजीव मिश्रा म्हणाले, ज्या एजन्सीकडून पुतळा उभारण्यात आला असेल त्यांनी शिल्पकाराला उंची वाढवण्याची सूचना केली असेल तर शिल्पकाराने त्यासंबंधीचा अभ्यास करण्याची गरज होती. कारण, एवढ्या मोठ्या उंचीचा पुतळा उभारण्यासाठी स्ट्रक्चरल इंजिनिअरची मदत घ्यावी लागते. तसेच त्या परिसरात पुतळा उभारताना कोणती तांत्रिक काळजी घेण्याची घ्यावी लागेल हे ही पहावे लागते. कदाचित हा अभ्यास न केल्यामुळे ही दुर्घटना घडली असेल, असे मिश्रा मिळाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+