'मुंबई गुजरातची, महाराष्ट्राची नाही!, BJP खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले; नव्या वादाला तोंड...
Nishikant Dubey on Raj Thackeray : हिंदी विरुद्ध मराठी भाषा तसेच त्रिभाषा सूत्रावरून महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बरीच उलथापालथ सुरू आहे. यातच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या अस्मितेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत, राज ठाकरे आणि मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, राज्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

'मुंबई गुजरातचा भाग, महाराष्ट्राचा नव्हे!'
निशिकांत दुबे यांनी हिंदी भाषेच्या नावावर चाललेल्या आंदोलनावर टीका करताना म्हटले की, मराठी भाषिक इंग्रजांची इंग्रजी भाषा स्वीकारायला तयार आहेत, तिचा त्रिभाषा सूत्रात समावेश आहे आणि ती शिकवण्यात त्यांना काहीही अडचण नाही. मात्र, हिंदी भाषेच्या नावावर 'डंका' वाजवला जात आहे. याच संदर्भात बोलताना दुबे यांनी अत्यंत वादग्रस्त विधान केले.
"मराठी मराठी करताय, मी सांगतो मुंबई तर गुजरातचा भाग होती. मुंबई महाराष्ट्राचा भाग नव्हती. 1956 मध्ये जेव्हा भाषेच्या आधारावर विभागणी झाली तेव्हा मुंबई महाराष्ट्राचा भाग झाली. खूप चांगली गोष्ट झाली ही.
यावरच न थांबता, त्यांनी मुंबईतील लोकसंख्येची आकडेवारी देत, केवळ 31 ते 32 टक्के मराठी भाषिक मुंबईत राहत असल्याचा दावा केला. तितकेच हिंदी भाषिक, 2 टक्के भोजपुरी, 12 टक्के गुजराती, 3 टक्के तेलुगु, 3 टक्के तमिळ, 2 टक्के राजस्थानी आणि 1 ते 2 टक्के उर्दू भाषिक मुंबईत असल्याचे त्यांनी सांगितले.
#WATCH | On his 'Patak Patak ke Maarenge' remark, BJP MP Nishikant Dubey says, "I am saying this again, I stand by my statements. This nation is diverse, and all its people have a strong affection for their region...If Maharashtra is a part of this country, then anyone can be… pic.twitter.com/U0CqZa2Zix
— ANI (@ANI) July 18, 2025
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर 'आमचाही अधिकार'?
महाराष्ट्राचे देशाच्या अर्थव्यवस्थेतील योगदान कोणीच नाकारत नाही असे म्हणताना, दुबे यांनी महाराष्ट्राकडून जो कर दिला जातो, त्यात 'आमचाही अधिकार' असल्याचे म्हटले. 'आमचाही म्हणजे कोणाचा?' असा प्रश्न विचारला असता, त्यांनी 'संपूर्ण देशाचा' असे उत्तर दिले.
टॅक्स पेयर कंपन्यांचा उल्लेख करत आव्हान
दुबे यांनी देशातील सर्वात मोठे करदाते असलेल्या एसबीआय (SBI) आणि एलआयसी (LIC) यांची उदाहरणे दिली. त्यांची मुख्यालये मुंबईत असल्यामुळे त्यांच्याकडून मिळणारा कर महाराष्ट्रात जातो, पण त्यात 'तुमचा आणि आमचाही पैसा' आहे असे ते म्हणाले. टाटा आणि बिर्ला यांच्या कंपन्यांच्या मुख्यालयांचा उल्लेख करत, त्यांच्याकडूनही महाराष्ट्राला कर मिळत असल्याचा मुद्दा त्यांनी उचलून धरला.
पुढे जाऊन त्यांनी थेट आव्हान दिले, "महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत असणाऱ्या पैशांवर आमचाही अधिकार आहे... तुम्हाला जर बिगर मराठी नागरिक योग्य वाटत नसतील तर, तुम्ही हाती दांडा घेऊन एसबीआयच्या चेअरमनसमोर उभे राहा. एलआयसी समोर जा, त्यांना मराठी नाही येत... मारा त्यांना. त्यांची मुख्यालयं जाऊदे बाहेर." मुंबईतील सिनेसृष्टीत असणाऱ्या अमराठी कलाकारांनाही बाहेर काढण्यास सांगून, मराठीत चित्रपट बनवायचा असेल तरच थांबा, अन्यथा निघून जा असा 'फुकाचा सल्ला' दुबे यांनी दिला.
राज ठाकरेंचा 'महाराष्ट्र स्टाइल' आणि 'डुबो-डुबो'चा इशारा
निशिकांत दुबे यांच्या या चिथावणीखोर वक्तव्याला राज ठाकरे यांनी अत्यंत कठोर भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. "मुंबईत जो कोणी मराठीचा अपमान करेल, त्याला महाराष्ट्र स्टाइलमध्ये उत्तर दिले जाईल. आम्ही कोणाशीही वैर घेत नाही, पण मराठी अस्मितेचा अपमान सहन करणार नाही," असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
याही पुढे जाऊन, ठाकरे यांनी दुबे यांना मुंबईत येऊन "समुद्रात डुबो-डुबोकर मारण्याचा" इशारा दिला. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी आपली भूमिका कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वादाची ठिणगी कशी पडली?
या संपूर्ण वादाची सुरुवात मुंबईच्या मीरारोड येथे एका गैर-मराठी व्यावसायिकाला मारहाण झाल्याच्या घटनेवरून झाली. राज ठाकरे यांनी या घटनेचे समर्थन करताना म्हटले होते की, "महाराष्ट्रात राहत असाल तर शांततेने राहा, मराठी शिका. मस्ती केली तर महाराष्ट्र स्टाइलमध्ये समजावून सांगू." मराठीचा अपमान करणाऱ्यांना गाल आणि हाताची "युती" निश्चित होईल असा इशाराही त्यांनी दिला होता.
यावर प्रत्युत्तर देताना निशिकांत दुबे यांनी ठाकरेंना आव्हान दिले होते की, "हिंदी भाषिकांना मारहाण करणारे महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवावे. महाराष्ट्राबाहेर येण्याची हिंमत दाखवा, आम्ही हिंदीचा अपमान करणाऱ्यांना पटक-पटक मारू." या शाब्दिक चकमकीने आता मुंबईच्या अस्मितेचा आणि मराठी भाषेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला असून, या वादामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
-
Eid ul Fitr 2026 : यंदा रमजान ईद कधी? सुट्टीची तारीख कोणती असेल; जाणून घ्या सविस्तर माहिती -
आजचे राशीभविष्य: सोमवार १६ मार्च २०२६, 'या' राशींना होणार प्रचंड धनलाभ; पाहा तुमची रास! -
LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! गॅस सप्लाय बंद होण्याची भीती वाटतेय? घरबसल्या करा e-KYC 'ही' सोपी पद्धत -
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Rajya Sabha Election 2026 Result : राज्यसभेच्या 37 जागांचा निकाल; पाहा विजेत्यांची यादी -
अदानी टोटल गॅसकडून औद्योगिक ग्राहकांसाठी अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या दरात कपात -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Gold silver price today : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा ताजे दर -
Oscars 2026 Winners : ऑस्कर पुरस्कारांची घोषणा हा चित्रपट ठरला सर्वात भारी; पाहा संपूर्ण विनर लिस्ट









Click it and Unblock the Notifications