मोठी बातमी : राज ठाकरेंकडून 2 उमेदवारांची घोषणा, ठाण्यातून उतरवला खास शिलेदार, दुसरी यादीही येणार
Raj Thackeray MNS announced list two candidates : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू झालेली आहे. काल भाजपने त्यांची 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. तर आज राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाकडून देखील दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी यापूर्वीच अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे राज ठाकरे हे महायुतीबरोबर नसणार हे अगदी स्पष्ट झाले आहे.
आमदार राजू पाटील यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे हे आज डोंबिवलीत आले होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, मी इथे भाषणासाठी आलो नसून माझ्या राजू पाटीलच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आलोय. मतदार यादीवर शेवटचा हात फिरवत आहे. आज किंवा उद्या दुसरी यादी जाहीर होईल, असे त्यांनी म्हटले.

अविनाश जाधव, राजू पाटील यांच्या नावाची घोषणा
राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा केली. तसेच अविनाश जाधव आणि राजू पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना राज ठाकरे स्वतः हजर राहणार आहेत, असेही त्यांनी म्हटले.
राज ठाकरेंनी घोषित केलेले उमेदवारांची यादी
1. बाळा नांदगावकर - शिवडी, मुंबई
2. दिलीप धोत्रे - पंढरपूर
3. लातूर ग्रामीण - संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा - बंडू कुटे
5. चंद्रपूर - मनदीप रोडे
6. राजुरा - सचिन भोयर
7. यवतमाळ - राजू उंबरकर
8. ठाणे - अविनाश जाधव
9. कल्याण-डोंबिवली - राजू पाटील












Click it and Unblock the Notifications