Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पावसाचे थैमान..! विदर्भात 4 ठार, नाग'पुरा'तून 50 विद्यार्थ्यांना वाचवले! आज राज्यात जोर'धार' बरसणार

नागपूर - मुंबई परिसरासह विदर्भात पावसाने थैमान घातले असून भंडारा, गोंदिया, चंद्रपुरात पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू झाला तर नागपुरातील एका महाविद्यालयात अडकलेल्या 50 विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली. आज राज्यात जोरदार पाऊस होणार असून काही जिल्ह्यांना ऑेरेंट अलर्ट देण्यात आला आहे.

पाऊस जूनमध्ये सुट्टीवर गेल्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात त्याने आपली भूमिका पार पाडायला सुरुवात केली. मुंबई, सिंधुदुर्ग, विदर्भात जोरदार पाऊस झाला. तर शुक्रवारी मध्यरात्रीपासून नागपूरसह पूर्व विदर्भात जोरदार पुनरागमन केले.

Rain update in Maharashtra

नागपुरात शनिवार पहाटे साडेपाच ते सकाळी साडेआठ या तीन तासात 81.8 मिमी आणि सकाळी 8.30 ते 11.30 या 3 तासात 135.6 मिमी अशी 6 तासात 217.4 मिमी पावसाची नोंद झाली.

चौघांचा बळी

भंडारा जिल्ह्यात वीज पडून 1 जणठार झाला तर चंद्रपूर जिल्ह्यात नाल्याच्या पुरात दोघांचा आणि गोंदिया जिल्ह्यात पिंडकेपार- गोटाबोडीत पुरात बुडून एकाचा मृत्यू झाला. गोसेखुर्द धारणाचे पुर्ण 33 दरवाजे उघडले आहेत.

50 विद्यार्थ्यांची सुटका

नागपूरच्या अॅण्टलिका कॉलेजमध्ये अडकलेल्या 50 विद्यार्थ्यांची सुटका अग्निशमन जवानांनी केली. अनेक घरात पाणी शिरले होते. सोनेगाव पोलिस ठाण्यात जणू तलावच झाला होता. कामठी तालुक्यात खेडी गावात 12 जणांची, वागधरा गावातील 5 मजुरांची सुटका केली. अनेक घरांना पाण्याचा वेढा असल्याने बोटीतून लोकांना बाहेर काढले.

भंडारा जिल्ह्यात आजही पाऊस

भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी सकाळपासून रिम-झिम पाऊस सुरू आहे.तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. काल जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानंतर जिल्ह्यात त सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्री अकरा वाजता पावसाने पुन्हा एकदा काही ठिकाणी रिमझिम सुरुवात केली होती मात्र मध्यरात्री उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पावासाने सुरुवात केली आहे.

शाळा- महाविद्यालये बंद

कालच नागपुरसह, भंडारा, हवामान खात्याने एक दिवस आधीच ऑरेंज अलर्ट दिलेला असल्याने नागपुरात शाळा- महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती. शहरातील रेल्वे स्थानकातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते.

येथे ऑरेंट अलर्ट

कोकणातील रायगड, रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सातारा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळमध्येही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

येथे येलो अलर्ट

मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, जालना, परभणी, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. धुळे, जळगाव, नाशिक, बुलढाणा, वाशीम, गोंदियात विजांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+