Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर; सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार

परभणी येथील दंगलीनंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सुर्यवंशीचा कोठडीतच मृत्यू झाला होता. त्यानंतरच्या पोस्टमार्टम अहवालात धक्कादायक बाबी समोर आल्यानंतर या प्रकरणाची चर्चा वाढली होती. राज्यभरच नाही तर देशभर या घटनेचा निषेध नोंदवला जावू लागला. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर येणार आहेत. आज दुपारी ते मयत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.

Rahul Gandhi

राहुल गांधींचा परभणी दौरा

राहुल गांधी यांच्या आजच्या परभणी दौऱ्याची माहिती राहुल गांधी यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यानुसार राहुल गांधी हे १२.३० वाजता नांदेड विमानतळावर येतील. त्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास ते परभणीत दाखल होतील. त्यानंतर ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतील. त्यानंतर दुपारी तीन वाजता ते विजय वाकोडे यांच्या कुटुंबाची भेट घेतील. सायंकाळी साडेसात वाजता ते पुन्हा दिल्लीला रवाना होतील.

इतर नेतेही परभणीला

राहुल गांधी यांच्या दौऱ्यानिमित्त राज्यातील काँग्रेसचे इतर नेतेही परभणीत त्यांच्यासोबत असतील, अशीही माहिती मिळत आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्यानिमित्त आज परभणीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्लीतील अनेक नेतेही परभणीत येतील, असे सांगितले जात आहे. या दौऱ्यात ते सर्व पिडीत कुटुंबाशी बोलतील, असेही सांगितले जात आहे.

महायुतीची टिका

राहुल गांधी परभणीत फक्त राजकारण करायला येत आहेत, अशी टिका महायुतीच्या नेत्यांनी केली आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनीही राहुल गांधी यांच्या दौऱ्यावर टिका केली आहे. "परभणीच्या घटनेत राहुल गांधी कुटुंबीयांना भेटायला जात आहे. राज्यघटनेची कशी विटंबना झाली, हे सरकारला दाखवण्यासाठी तिथे जात आहेत. त्यांना सूर्यवंशी कुटुंबाशी यांच्याशी काहीही सहानुभूती नाही. ते फक्त राजकारणासाठी जात आहे. आज आम्ही बीड आणि परभणीला जात आहोत. आम्हाला जातीय सलोखा राखायचा आहे. जाती जातीत भांडण लावायची नाही. राहुल गांधी पक्षाचे धोरण म्हणून जात आहेत. आम्ही बीड परभणीला माणुसकी म्हणून जात आहोत", असे संजय शिरसाट म्हणाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+