Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावर, हिंसाचारात मृत्यू झालेल्या सोमनाथच्या कुटुंबियांची भेट घेणार

Rahul Gandhi will visit Parbhani on Sunday : काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या रविवारी दि.22 डिसेंबरला परभणीच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यात ते परभणी हिंसाचारात बळी गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहेत. त्यांच्यासोबत विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांची उपस्थिती असणार आहे.

परभणीत गत आठवड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती. त्यानंतर आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनात दगडफेकही झाली होती.

Rahul Gandhi will visit Parbhani

कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सोमनाथचा मृत्यू

या घटनेनंतर परभणी पोलिसांनी शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवत लाठीचार्ज केला होता. तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासह शेकडो आंदोलकांना अटकही केली होती. त्यात सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता.

मारहाणीत मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या शवविच्छेदन अहवालानुसार, त्यांच्या अंगावर मारहाणीच्या जखमा होत्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी रविवारी परभणीच्या दौऱ्यावर येऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.

फडणवीस यांचा दावा कोणी फेटाळला?

मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील निवेदनानंतर अवघ्या 10 मिनिटांतच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने त्यांचा दावा फेटाळला होता. माझा मुलगा 4 दिवस त्यांच्या ताब्यात होता. माझा मुलगा आजारी होता, तर त्यांनी आम्हाला का बोलावले नाही? आता ते माझा मुलगा आजारी असल्याचा दावा करत होता.

पण माझ्या मुलाला कोणतेही व्यसन नव्हते. तो ठणठणीत होता. त्याचा मृत्यू होईपर्यंत पोलिसांनी आम्हाला बोलावले नाही. त्याच्या अंगावर मारहाणीच्या जखमा होता असे रिपोर्टमध्ये का आले? असा सवाल सूर्यवंशी यांच्या आईने उपस्थित केला आहे.

कोण आहे सोमनाथ सूर्यवंशी?

सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी एक विद्यार्थी होता. त्याचा जन्म 23 जुलै 1989 रोजी झाला होता. आधार कार्डवर नमूद पत्त्यानुसार तो पुण्यातील भोसरी या भागात राहायचा. त्याने परभणी येथील एका महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला होता. सध्या त्याची तिसऱ्या वर्षाची परीक्षा सुरू होती. त्यासाठी तो पुण्याहून परभणीत आला होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+