Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Rahul Gandhi : कॉंग्रेसचं ठरलं! राहुल गांधी- प्रियांका गांधींच्या महाराष्ट्रात होणार भव्य सभा

Maharashtra Assembly Election 2024 : सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तत्पूर्वीच महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीकडून मोठी बातमी देण्यात आली. राज्यात निवडणुकीच्या काळात कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि नेत्या प्रियांका गांधी यांच्या भव्य सभा होणार आहेत. त्याचे नियोजन देखील झाले असून कॉंग्रेस कमिटीकडून सभांची संख्या देखील सांगण्यात आली आहे.

राज्यभरातील पक्षांनी आतापासूनच या निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेत्यांकडून सद्या बैठका व कार्यकर्ता प्रशिक्षणावर जोर दिला जात आहे. सभा, बैठका, रॅली यामार्फत लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न राज्यातील सर्वच पक्ष करत आहेत. विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी राजकीय रणनीतीकारांची मदत घेतली जात आहे. भाजपासारखा राष्ट्रीय पक्ष केंद्रातील नेत्यांनाही महाराष्ट्रात प्रचारासाठी बोलवणार आहेत. त्यात आता काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी मोठी योजना केली आहे. काँग्रेसचे सध्याचे सर्वोच्च नेते राहुल गांधी महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. ते विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रभर जाहीर सभा घेणार असून त्यासाठी काँग्रेसकडून बारकाईने नियोजन केले जात आहे.

Rahul Gandhi- Priyanka Gandhi

सांगलीच्या दौऱ्यात राहुल गांधींचा शब्द

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात विक्रमी सभा होणार आहेत. स्व:त राहुल गांधी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी येण्यास उत्सुक आहेत. तुम्ही बोलवाल तेथे मी सभेला येईल, असे राहुल गांधी यांनी प्रदेश नेतृत्वाला नुकत्याच झालेल्या सांगली दौऱ्यानिमित्य एका बैठकीत सांगितले.

प्रियांका गांधींच्या 10 सभा होणार

राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात जवळपास 15 सभा तर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या जवळपास 10 सभा वेगवेगळ्या जिल्ह्यात होणार आहेत. तसे नियोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीकडून केले जात आहे.

भाजपा नेत्यांच्या मतदारसंघांवर विशेष लक्ष

विशेषत: देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन,चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यासारख्या भाजपाच्या प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघांना केंद्रस्थानी ठेवून राहुल गांधी यांच्या सभांचे नियोजन प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने केले जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+