राहुल गांधींचा फडणवीसांवर गंभीर आरोप; गांधींच्या आरोपाने नव्या वादाला तोंड फुटणार
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघावर संशय व्यक्त करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

राहुल गांधींचा आरोप आहे की, अवघ्या 5 महिन्यांत फडणवीसांच्या मतदारसंघातील मतदार यादीत तब्बल 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या अल्प काळात झालेली ही वाढ संशयास्पद असल्याचं ते म्हणाले.
काही बूथवर तर 20 ते 50% पर्यंत वाढ, राहुल गांधींचा दावा
राहुल गांधी यांनी समाज माध्यम 'एक्स'वर पोस्ट शेअर करत हे गंभीर आरोप मांडले. त्यांनी म्हटले की, काही निवडणूक केंद्रांवर 20 ते 50 टक्क्यांपर्यंत मतदारांची वाढ झाली आहे. इतकंच नव्हे तर, बीएलओ अधिकाऱ्यांनी ओळख न पटलेल्या व्यक्तींनी मतदान केल्याची नोंद देखील केली आहे. अनेक पत्त्यांची पडताळणी न करताच हजारो नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.
In Maharashtra CM’s own constituency, the voter list grew by 8% in just 5 months.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 24, 2025
Some booths saw a 20-50% surge.
BLOs reported unknown individuals casting votes.
Media uncovered thousands of voters with no verified address.
And the EC? Silent - or complicit.
These aren’t… pic.twitter.com/32q9dflfB9
"निवडणूक आयोग गप्प का?" - राहुल गांधींचा सवाल
मतदार यादीतील अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर देखील प्रश्न उपस्थित केला. "या सगळ्या गोंधळात आयोग गप्प का आहे? की तोही या प्रक्रियेत सहभागी आहे?" असा सवाल त्यांनी थेट विचारला आहे.
"मतदान यादी पारदर्शक करा" राहुल गांधींची मागणी
राहुल गांधी यांनी पुढे असेही म्हटले आहे की, निवडणुका पारदर्शक व्हाव्यात यासाठी मशीन रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज तात्काळ प्रसिद्ध करावे. त्याचबरोबर त्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये नागरिकांचा विश्वास टिकून राहावा यासाठी गंभीर उपाययोजना करण्याची गरज असल्याचंही स्पष्ट केलं.
या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात नवा खळबळजनक मुद्दा निर्माण झाला आहे. आता निवडणूक आयोग किंवा राज्य सरकार यावर काय प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications