अगोदर अश्लील कृत्य आता माफीनामा; पुण्यात नंगानाच करणाऱ्या 'त्या' तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील सिग्नलवर लघुशंका करुन, महिलांसमोर अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजा अखेर जमिनीवर आला आहे. एवढा वेळ हवेत उडणाऱ्या या बडे बाप की औलादने अखेर माफी मागितली आहे. पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरु आहे. दरम्यान, त्याचा मित्र भाग्येस नीबजीया याला यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

नेमकं काय होतं प्रकरण
सुनील शिरसाट नावाच्या व्यक्तीने गौरव आहुजाचा अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ शुट केला. व्हिडीओमध्ये दिसणारी बीएमडब्ल्यू कार MH-12AF 8419 ही मनोज आहुजा नावाच्या व्यक्तिच्या नावावर आहे. व्हिडीओ शूट केलेल्या सुनील शिरसाट यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, "आता आपण शास्त्रीनगर चौकामध्ये आहोत, या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. एक बीएमडब्ल्यू कार चालवणारा आला होता. त्याने अश्लील चाळे केले, भर रस्त्यात त्याने लघुशंका केली. तो आणि त्याचा मित्र होता. मी त्यांना विचारल्यानंतर ते फुल स्पीडने वाघोलीकडे गेले. व्हिडीओमध्ये दिसत आहे की दोघे दारू पिऊन गाडी चालवत आहेत. त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे."
पोलिसांनी ताब्यात घेतलं
गौरव आहुजा असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. या प्रकरणामुळे शहरात वातावरण चांगलंच तापलं आहे. पुण्यात नंगानाच करणाऱ्या या तरुणाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओत तो या प्रकरणी माफी मागताना दिसत आहे. "मी गौरव आहुजा, राहणार पुणे, काल माझ्याकडून जे कृत्य झालं होतं, ते खूप चुकीचं होतं. मी मनापासून माफी मागतो. संपूर्ण जनता, पोलीस प्रशासन आणि शिंदे साहेबांची माफी मागतो. मला माफ करा आणि मला एक संधी द्या. सॉरी", असे गौरव आहुजाने म्हटले आहे.
गौरवचे वडील काय म्हणाले?
पुण्यात नंगानाच करणाऱ्या या तरुणाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. गौरव आहुजा याचे वडील मनोज आहुजा यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला. 'गैरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते, त्याने सिग्नलवर लघुशंका नाही केली तर माझ्या तोंडावर केली आहे. मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे, असं मनोज अहुजा यांनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications