Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुण्यात धक्कादायक प्रकार, महिला पोलिस अधिकाऱ्यावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली. महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असताना हा प्रकार घडल्याची माहिती सध्या समोर येत आहे.

Pune Police

दरम्यान, पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पुण्यातील फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. या घटनेनं अवघा महाराष्ट्र हादरून गेला आहे. फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर काल (शुक्रवारी) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू होती. ही कारवाई सुरू असताना महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न एका वाहनचालकाने केला.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. संजय फकिरा साळवे (रा. पिंपरी चिंचवड, मूळगाव- जालना) असे संशयीताचे नाव असल्याचे समजते. आरोपीनं दारू पिऊन हे धक्कादायक कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे.

असा घडला सगळा प्रकार

ड्रंक अँण्ड ड्राईव्हच्या घटना पुण्यात वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांना रात्रीची गस्त व बंदोबस्त लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रात्री जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांची तपासणीही सुरु आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर अशी कारवाई सुरू होती. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यानं एका गाडीला थांबवलं, गाडीची तपासणी केली. त्यावेळी ड्रायवर मद्यधुंद अवस्थेत असल्याचं आढळून आलं. त्यानंतर ड्रायव्हरनं महिला पोलिसावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली. अधिक तपास सुरु आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+