कार सिग्नलवर थांबवली, खाली उतरला चौकातच लघुशंका अन् अश्लील चाळे; पुण्यात किळसवाणा प्रकार, VIDEO
Pune Viral Video : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात नेमकं चाललंय काय, असा सवाल आता विचारला जात आहे. कधी तरुणीवर अत्याचार तर कधी हातामध्ये चाकू तलवार घेऊन भररस्त्यात तरुणीवर होणार हल्ला असो की काही दिवसांपुर्वी कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना उडवल्याची घटना.
अशातच पुण्यातील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका युवकाने कार चालवली अन् भररस्त्यात उभी करून त्याने लघुशंका केली व अश्लील चाळे देखील केले. व्हायरल व्हिडिओ नंतर आता लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकी काय घडली घटना?
पुणे शहरातून व्हायरल झालेल्या या व्हिडिओत दिसून येत आहे की, मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध चारचारी गाडी उभी करून दारूच्या नशेत तरूणांनी अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेमध्ये तरूणांनी अश्लील चाळे करत, सिग्नलवरती रस्त्याच्या मधोमध BMW गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केल्याची घटना समोर आली आहे.
Pune Viral Video: 'Drunk' BMW Driver Halts In Middle Of Yerawada Road To Pee, Flashes At Locals Who Objecthttps://t.co/zumsY1QKDN@VijayKumbhar62 pic.twitter.com/ZNvRdxmnXn
— Pune First (@Pune_First) March 8, 2025
कुठे घडला संपूर्ण प्रकार?
पुणे नगर रोडवरती शास्त्रीनगर चौकातील ही संतापजनक घटना आहे. सिग्नलवरती BMW गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केली. जाब विचारायला गेलेल्या व्यक्तीनं समोर देखील या तरूणांनी अश्लील कृत्य केलं. त्याचबरोबर भरधाव वेगात गाडी चालवून तरुण मित्रासह फरार झाला. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील गुन्हेगारी आणि गुन्ह्यांच्या घटना यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशातच असं वर्तन करणाऱ्यांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचं चित्र दिसून येत आहे.












Click it and Unblock the Notifications