Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुण्यात तिसऱ्या मजल्यावर 4 वर्षांची मुलगी ग्रिलला लटकली, थरारक Video व्हायरल, कसे वाचले तिचे प्राण!

Pune video viral, 4-year-old girl stuck on third floor : मंगळवारी सकाळी पुण्यातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एक हृदयद्रावक घटना घडली. एका चार वर्षांच्या मुलीचे डोके खिडकीच्या ग्रिलमध्ये अडकले आणि ती लटकलेल्या अवस्थेत सापडली.

सुदैवाने, तिथेच राहणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानाने वेळीच पाहिल्याने तिचा जीव वाचवण्यात यश मिळाले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही, वेळीच जर तिला मदत झाली नसती तर मात्र मोठी दुर्घटना घडली असती.

Pune video goes viral

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास, गुजर निंबाळकरवाडी परिसरातील सोनवणे इमारतीत घडली. पीडित मुलगी घरात एकटीच होती. तिची आई मोठ्या मुलीला स्कूल बसमध्ये सोडण्यासाठी बाहेर गेली होती आणि चुकून तिने घराचा दरवाजा बंद केला होता.

मुलीने खिडकीतून डोकावून पाहिले अन्...

घरात एकटी असलेल्या मुलीने खेळता खेळता खिडकीजवळ जाऊन ग्रिलमधून डोकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिचे डोके ग्रिलमध्ये अडकले आणि ती लटकलेल्या अवस्थेत होती. ही धोकादायक अवस्था त्याच इमारतीत राहणाऱ्या एका अग्निशमन दलाच्या जवानाच्या लक्षात आली.

त्वरीत तिसऱ्या मजल्यावर घेतली धाव!

त्याने त्वरित तिसऱ्या मजल्यावर धाव घेतली. घराचा दरवाजा बंद असल्याने तो खाली गेला आणि मुलीच्या आईला या घटनेबाबत माहिती दिली. नंतर दोघांनी मिळून वर जाऊन मुलीची सुटका केली. वेळीच मदत झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि मुलीचा जीव वाचला. ही घटना परिसरात घबराट पसरवणारी ठरली, मात्र अग्निशमन जवानाच्या सतर्कतेमुळे सुखद शेवट झाला. त्या व्यक्तीचे सर्वांनी आभार देखील व्यक्त केले.

यांनी वाचवले प्राण!

'मटा'च्या अहवालानुसार, उमेश सुतार नावाच्या व्यक्तीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून अग्निशमन दलातील तांडेल योगेश चव्हाण हे त्याच सोसायटीत राहणारे व्यक्ती धावत बाहेर आले. त्यांनी गॅलरीत येऊन पाहिले. त्यावेळी भाविका चांदणे नावाची 4 वर्षांची मुलगी खिडकीत अडकली होती. घरात कोणीच नव्हते. तिची आई दुसऱ्या मुलीला शाळेत सोडायला गेली होती. त्यांनी त्वरीत धाव घेऊन त्या मुलीला वाचवले. हा सर्व थरार व्हिडिओत कैद झाल्याने एकच खबबळ उडाली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+