पुण्यात पुन्हा अपघात, अल्पवयीन मुलाने चालवला टँकर; अनेकांना उडवलं
पुणे: पुण्यात अपघाताची मालिका काही थांबायच नाव घेत नाहीय. आधी पोर्शे कार अपघात प्रकरण नतर आमदाराच्या पुतण्याच कार अपघात प्रकरण ताज असतानाच पुन्हा एक अपघाताची घटना घडली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने सुसाट वेगाने टँकर चालवत रस्त्यावर चालणाऱ्या अनेकांना उडवलंय.
या अपघातात दुचाकीस्वार पती-पत्नीसह व्यायामासाठी निघालेले लहान मुलेही जखमी झाली आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शहरातील वानवाडी परिसरात शनिवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी संतोष ढुमे आणि त्यांच्या पत्नी हे दुचाकीवरून वानवाडी परिसरातून जात होते. त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या मुली व्यायामासाठी रस्त्यावरून धावत होत्या. त्याचवेळी अचानक पाठीमागून भरधाव वेगात एक टँकर आला.
काही क्षणातच या टँकरने ढुमे यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जबर होती, की ढुमे यांच्या पत्नी दुचाकीवरून खाली कोसळल्या.सुदैवाने त्यांच्या अंगावरून टँकरचे चाक गेले नाही.
एवढ्याचवरच हे टँकर थांबले नाही, पुढे या टँकरने मॉर्निंग वॉकला निघालेल्या लहान मुलांनाही धडक दिली. यामुळे काही मुले आणि महिला जखमी झाली आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे अवघ्या १४ वर्षांचा मुलगा हा टँकर चालवीत होता. अपघातानंतर नागरिकांनी हा टँकर अडवून चालकाला पकडून ठेवले.
दरम्यान, या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.












Click it and Unblock the Notifications