Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

pune swargate rape case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी

स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पुणे न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शिरुरमधून त्याला अटक करण्यात आली होती आणि पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

या प्रकरणात आरोपीसोबत आणखी साथीदार आहेत का याचा तपास करायचा आहे. तसेच या प्रकरणातील आरोपीचा मोबाईल हस्तगत करायचा असून त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.

मंगळवारी पहाटे तरुणीवर झाला होता अत्याचार

मंगळवारी पहाटे स्वारगेट बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या एका बसमध्ये दत्ता गाडेने 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. यानंतर दत्ता गाडे पसार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी आठ पथकं पाठवली होती. दोन दिवस शोध घेतल्यानंतर शुक्रवारी पहाटे शिरुरमधून दत्ता गाडेला पोलिसांनी उचललं होतं.

Pune Rape News

वकिलांनी काय केला युक्तिवाद?

न्यायालयात सरकारी वकिलांनी काही युक्तिवाद केला. ते म्हणाले की, आरोपीवर दाखल असलेल्या 6 गुन्ह्यापैकी 5 गुन्ह्यात तक्रारदार महिला आहेत. त्यामुळे त्याचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ते स्पष्ट होते आहे. या गुन्ह्यामुळे समाजात तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपचा आहे. आरोपी सराईत असल्याने त्याने यापूर्वी आणखी काही महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत गैरकृत्य केलेले आहे का हे तपसायचे आहे. त्याचबरोबर आरोपीला मदत करणारे आणखी काहीजण त्याच्यासोबत आहेत का हे तपासायचे आहे, असे त्यांनी सांगितले.

या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी 14 दिवसांची पोलिस कोठडी आवश्यक आहे. सरकारी वकिलांनीही याआधी गुन्ह्याची आणि आरोपीवर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती दिली. आतापर्यंत या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज, गुन्ह्याच्या वेळी वापरलेले कपडे तसेच आणखी काही मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत.

मारहाण करुन लैंगिक अत्याचार केला

आरोपीने तरुणीला कडेंक्टर असल्याचं भासवत विश्वास संपादन केला. बसमध्ये अनेक लोक असल्याचं त्याने भासवले. पण बस पूर्ण रिकामी होती. फिर्यादीने बसमधून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणीने बाहेर सोडा अशी विनंती केली. पण आरोपीने जबरदस्तीने अत्याचार केला. मारहाण करून दोन वेळा लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तो पळून गेला.

आरोपीच्या वकिलाचे म्हणणे काय?

दुसरीकडे, आरोपी गाडेच्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सदर तरुणी ही मोठ्याने ओरडू शकत होती. डिफेन्ससाठी लोक बोलावू शकत होती. मात्र, यामध्ये कोणतीही जबरदस्ती झालेली नाही. तिने 'वाचवा-वाचवा', असंही म्हटलेलं नाही. न्यायालयाने दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आम्ही आरोपीला विचारलं की, सत्य घटना काय आहे? त्यावेळी त्याने सांगितलं की, गाडीमध्ये अगोदर ती चढली. त्यानंतर मी गेलो. आमच्यामध्ये जे झालं ते दोघांच्या संमतीने झालं.

दोघांच्या मर्जीने झालेलं आहे. तो का पळाला याच्याबाबत आम्हाला काही माहिती नाही. पोलिसांनी रिमांडमध्ये मागणी केली आहे की, त्याचा मोबाईल जप्त करायचा आहे. त्याचं मेडिकल करायचं आहे आणि त्याचे साथीदार कोण होते? हे तपासण्यासाठी पोलिसांनी कोठडी मागितली होती. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+