Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एमपीएसीच्या विद्यार्थांना न्याय मिळण्यासाठी शरद पवार मैदानात उतरणार

पुणे : आयबीपीएस परीक्षा व एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियमित राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन परीक्षा एकाच दिवशी म्हणजे 25 ऑगस्टला होणार आहेत. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसमोर पेच निर्माण झाला. यासंदर्भात सरकार दरबारी वारंवार मागणी करूनदेखील त्याची पुरेशी दखल घेतली गेली नसल्यामुळे अखेर हे परीक्षार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत.

मंगळवारी रात्रीपासूनच या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केलं आहे. परीक्षांच्या तारखा बदलाव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहेत. त्याव्यतिरिक्त 2021 व 2022 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमधून कृषी विभागात निवड झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. यासंदर्भातही परीक्षार्थींनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Sharad Pawar

शरद पवारांचा सरकारला अल्टिमेटम!

परीक्षार्थींनी आपली मागणी आंदोलनाच्या माध्यमातून मांडली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्याशिवाय, भाजपाकडूनही काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन याबाबत भूमिका मांडली आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली असून त्यामध्ये या मुद्द्यावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी शिंदे सरकारला अल्टिमेटम दिला आहे. बुधवारी रात्री 12 च्या सुमारास शरद पवार यांच्या एक्स अकाऊंटवर यासंदर्भात केलेल्या पोस्टमध्ये माहिती देण्यात आली आहे.

आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर शरद पवार म्हणाले की, "पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार", असं शरद पवार या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 22 ऑगस्ट म्हणजेच आज यासंदर्भात बैठक पाचारण केली आहे. त्याची माहिती त्यांनी एक्स अकाऊंटवर दिली आहे. या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते याकडे सर्व आंदोलक परीक्षार्थींचं लक्ष लागलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट काय?

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली आहे. त्यांनीही आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली. ते म्हणतात, "आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत. तसेच कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे. आज दुपारी एक बैठक घेऊन त्यात यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल, असे त्यांनी मला आश्वस्त केले आहे", असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+