Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

प्रांजल खेवलकरानी हॉटेलमध्ये रूम बुक करुन मुलींना बोलवले! तक्रारीनंतर रोहिणी खडसेंचे मोठे वक्तव्य..

Pune rave party Pranjal Khewalkar booked room in hotel : पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकरांसमोर अडचणी वाढताना दिसत आहेत. त्यांच्याविरोधात महिला आयोगात तक्रार दिल्यानंतर आता रोहिणी खडसेंची प्रतिक्रीया समोर आली आहे. "आपलाच बॉल, आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार ! सगळं व्यवस्थित स्क्रीप्टनुसार सुरू आहे..." असे त्यांचे ट्वीट आता चर्चेत आहे.

Pune rave party Pranjal Khewalkar

Take a Poll

रोहिणी खडसेंचे ट्वीट काय आहे?

नुकतेच माध्यमांतून महिला आयोगाने डॉ. खेवलकर यांच्या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांना दिलेले पत्र वाचले.

मुद्दा क्र. १ ज्या सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने या प्रकरणात राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. ती संस्था राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला विभागाच्या बीड जिल्ह्याची अध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांची आहे.

मुद्दा क्र. २ राज्यात महिलांच्या विरोधात इतके प्रकरण घडले, वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणासारखे हुंडाबळीचे प्रकरण घडले. यात खुद्द अजित पवार गटाच्या पुण्यातील महत्त्वाचे पदाधिकारी आरोपी आहेत. तेव्हा ही संस्था कुठे होती ? राज्यात महिलांवर इतके अत्याचार होतात तेव्हा ही संस्था कुठे होती ? मग आताच ही संस्था बाहेर कशी काढली गेली ?

मुद्दा क्र. ३ राज्यातील अत्याचारग्रस्त महिलांची साधी विचारपूसही न करणाऱ्याला महिला आयोग अध्यक्षांना आज अचानक कसे कर्तव्य आठवले ? इतके कसे कार्यतत्पर झाले ? आपलाच बॉल, आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार ! सगळं व्यवस्थित स्क्रीप्टनुसार सुरू आहे...

महिला आयोगात काय झाली तक्रार दाखल?

महिला आयोगाने ट्वीट करत म्हटले की, कु. सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांचा तक्रार अर्ज आयोग कार्यालयास ईमेलद्वारे प्राप्त झाला आहे. पुणे शहरातील खराडी येथे २४ जुलै २०२५ रोजी एका हॉटेल मध्ये रेव्ह पार्टी चालू असताना पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये सात जणांना पोलिसांनी अटक केली असून, काही महिलांचाही यामध्ये समावेश आहे, आरोपी प्राजल खेवलकर यांनी २८ वेळा हॉटेल मध्ये रूम बुक करून अनेक वेळा मुलींना बोलविले होते. कक्षात हया मुली परप्रांतातून आमिष दाखवून आणल्याचे स्केट दिसून येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कार्यवाही व्हावी, असे नमूद केले आहे.

काय आहे महिला आयोगाचे ट्विट

परप्रांतीय मुलींना आमिष दाखवून बोलावल्याचे रॅकेट दिसून येत आहे. सदर प्रकरण संघटित गुन्हेगारीचे तसेच मानवी तस्करीचे असल्याचा संशय अर्जदाराने व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कार्यवाही व्हावी असे नमूद केले आहे. आयोगाने पोलिस आयुक्त, पुणे यांना सदर प्रकरणाची मानवी तस्करी विरोधी पथक, सायबर विभाग यांच्यामार्फत तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

तक्रार अर्जानुसार हे चार आहेत प्रश्न

१. आरोपी श्री. प्रार्जल ओवलकर २८ वेळा रुम बुक करणे ही क्रिया स्वतात संशयास्पद असून, हा संगठित रकेट असाल्याचा गंभीर अंदाज आहे.

२. महिलांना कोणत्या उद्देशाने बोलावले गेले? त्यांना फसवून किया दबावाखाली वापरण्यात आले होते का

३. ज्या महिलांचे मूळ गाव, वय, ओळखपत्र व मेडिकल तपासणीचे अहवाल त्वरीत गोळा करुन त्यांचे संव्वाण करणे आवश्यक आहे.

४. मानव तस्करीविरोधी पथक सायबर विभाग व महिला पोलीस अधिकाऱ्याच्या सहाय्याने सपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात बाबी.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+