Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुण्यात पुन्हा पुरपरिस्थिती ; नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर करा, मुख्यमंत्र्याकडून निर्देश

Pune Rain Update : पुण्यात आज सकाळापासून पावसाला सुरुवात झाली आहे. धरणक्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं पुणे जिल्हातील धरणं पूर्ण भरली आहेत. खडकवासला धरणातून आज सकाळी 11 वाजता 35 हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. पुणे परिसरात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातील घाटमाथा आणि परिसरात न जाण्याचे आदेश ही प्रशासनाने दिले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील पुरपरिस्थितीकडे स्वत: लक्ष घातलं आहे. पुणे शहर आणि परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याआधीच नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्थलांतरीत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे जिल्हाधिकारी, पुणे शहर महापालिका आयुक्त आणि आपतकालिन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशा फोनवरून चर्चा केली आहे.

Pune Rain

ब्लू पूर रेषाच्या आत रहाणाऱ्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व स्थलांतरीत नागरिकांच्या दोन्ही वेळ जेवणाची, रहाण्याची आणि त्यांना लागेल ती मदत करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पुण्यातील पुरपरिस्थितीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार लक्ष ठेवून आहेत. पवार हे रविवारी बारामती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी फोनव्दारे संपर्क साधत प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पाण्याचा वाढता विसर्ग लक्षात घेवून नागरिकांना तशा सूचना दिल्या आहेत.

पुण्यातील एकतानगर भागात पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे.एकतानगरमधील द्वारका सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी आलं आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत सकाळी 11 च्या सुमारास 35 हजार क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील एकतानगरचा भाग जलमय झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरुच आहे त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+