रस्त्यावरील खड्ड्याने घेतला 61 वर्षीय ज्येष्ठाचा बळी; थरारक अपघाताचे CCTV फुटेज समोर
पुणे शहरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे एका 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. औंध परिसरातील राहुल हॉटेलजवळ हा अपघात घडला, ज्यामध्ये दुचाकीस्वार खड्ड्यात पडून मागून येणाऱ्या कारखाली चिरडला गेला. या अपघाताचे थरारक दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

जगन्नाथ काशिनाथ काळे असे अपघातात मरण पावलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. औंधमधील एका गजबजलेल्या रस्त्यावरून ते दुचाकीने जात असताना, रस्ता आणि पेव्हर ब्लॉकच्या मधोमध असलेल्या एका खड्ड्यामुळे त्यांची दुचाकी घसरली. तोल गेल्याने ते रस्त्यावर पडले आणि त्याच क्षणी पाठीमागून आलेल्या एका भरधाव कारच्या चाकाखाली चिरडले गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचा बळी जाण्याच्या घटना पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. या घटनेनंतर प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Caught On Camera: Senior Citizen Crushed To Death By Car After Bike Skids In Pune’s Aundh pic.twitter.com/o0D72sBBOq
— Pune First (@Pune_First) August 1, 2025
खड्ड्यांच्या निषेधार्थ 'आप'चे आंदोलन
दरम्यान, आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी गणेशपेठ येथील मुख्य बसस्थानक चौकात 'खड्ड्यात समाधी' आंदोलन केले. प्रशासनाचा निषेध करण्याचा त्यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आणि आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. शहरातील रस्त्यांची दुर्दशा आणि त्यामुळे होणारे अपघात यावर नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.












Click it and Unblock the Notifications