Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Pune News: "आई मला मरायचंय, या माझा मृतदेह घेऊन जा" पुण्यात व्हिडिओ क्लिप पाठवून तरुणाची आत्महत्या!

Pune News Youth commits suicide : पिंपरी चिंचवडमधून एक मोठी बातमी आली असून एका अठरा वर्षीय तरुणाने आई आणि बहिणीसाठी व्हिडिओ तयार करुन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या हृदयद्रावक घटनेने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

"आई, मला मरायचं आहे, मी विष प्यायलोय, मी मोबाइल फोडून टाकतोय. पुरावा राहणार नाही, मी लोकेशन पाठवलं आहे. येऊन माझा मृतदेह घेऊन जा..." अशी क्लिप त्याने कुटुंबियांना पाठवल्याचेही समोर आले आहे.

Pune News Youth commits suicide

प्राप्त माहितीनुसार, पिंपरीमध्ये ही घटना घडली असून संजयकुमार विनोदकुमार राजपूत (वय १८) असे मृताचे नाव आहे. तो बांधकाम मजूर होता अशी माहिती समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडी येथे देहू रोडवर इमारतीत तो कामाला होता. गेल्या १७ तारखेपासून तो बेपत्ता होता अशी माहिती असून देहू रोड पोलिस ठाण्यात तो हरवल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती,पण नंतर त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

विषाची बाटली अन् सापडली चिठ्ठी! (Pune News Youth commits suicide)

एबीपी माझाच्या वृत्तानुसार, आर्थिक चणचणीमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्याने आत्महत्येपुर्वी चिठ्ठी लिहीली असून यामध्ये त्याने "मम्मी, मला मरायचं आहे, मी विष प्यायलो आहे. मी मोबाईल फोडून टाकतोय. पुरावा राहणार नाही. मी लोकेशन पाठवले असून माझा मृतदेह घेऊन जा." अशी ऑडीओ आणि व्हिडिओ क्लिप त्याने कुटुंबियांना पाठवला आहे.

आत्महत्येपुर्वी व्हिडिओ तयार केला (Pune News Youth commits suicide)

प्राप्त माहितीनुसार, आत्महत्येपुर्वी बांधकाम कामगार असलेल्या व्हिडिओ तयार केला यामध्ये तो म्हणतो की, "जसे काही लोक मरतात तसा मी मरेल. बाकी मला कुणाशी काही ऐकायचे नाही. बस्स मी माझ्या आई वडिलांना ऐवढेच सांगतो की,
माझ्या बहिणीला कुणी त्रास देऊ नये, आणि मला याशिवाय अजून काही नको. मला माझ्या बहिणींची खूप चिंता आहे. मला त्यांच्यापेक्षा जास्त कुणाचीच चिंता नाही. "

"माझे जीवन आता.. "

व्हायरल झालेल्या व्हिडिओत हा तरुण पुढे म्हणतो की, "मला दोन बहिणी आहे त्यांना काही व्हायला नको. त्यांचे पालनपोषण चांगल्या पद्धतीने व्हावे त्यांनी खूप शिकावे आणि पुढे जावे हेच वाटते. माझे जीवन आता काही कामाचे राहीले नाही मी स्वतःला संपवू इच्छितो," असेही त्याने या व्हिडिओत म्हटले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+