Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Pune News : पुणेकरांसाठी खूशखबर, विठ्ठलवाडी-फनटाईम थिएटर उड्डाणपूलावरुन 'या' दिवशी वाहतूक सुरु होणार

Pune News :पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील सर्वात लांब 2.2 किलोमीटरचा सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी ते फनटाईम थिएटर हा उड्डाणपूल आता नागरिकांना सेवा देण्यासाठी तयार आहे. या मार्गावरुन लवकरच वाहतूक सुरु होणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, पुण्याचे महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांनी विठ्ठलवाडी ते फनटाईम थिएटर या उड्डाणपुलाची पाहणी केली. या पाहणीनंतर उद्घाटनासाठी त्यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी आणखी एक उड्डाणपूल सेवेत येणार आहे.

Pune News Vitthalwadi-Funtime Theater flyover to open on April 27

उड्डाणपुलामुळे पुणेकरांची 'कोंडी' कमी होणार!

सिंहगड रोडवर सातत्याने वर्दळ असते. ही वर्दळ आता कमी होणार आहे कारण विठ्ठलवाडी ते फनटाईम थिएटरपर्यंत जो उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. त्यामुळे एक पर्याय वाहनधारकांना खुला होणार आहे. त्यामुळे या मार्गावरुन जाताना आधीसारख्या कोंडीचा सामना करण्याची गरज पुणेकरांना भासणार नाही. एका अर्थाने हा पूल पुणे शहराच्या सौंदर्यात भर घालणारा ठरणार आहे.

शहरातील सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी ते फनटाईम थिएटरदरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम पुर्ण झाले त्यामुळे उद्घाटनाची औपचारिकता करु नका, हा पूल लवकर सुरु केला तर वाहतूक कोंडी टळून नागरिकांचा त्रास टळेल. त्यामुळे उड्डाणपूल नागरिकांसाठी सुरु करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे केली होती. त्यांनी यासंदर्भात एक ट्विटही केले होते.

काय आहे पुलाची वैशिष्ट्य?

  • सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी ते फनटाईम हा उड्डाणपूल पुणे शहरातील सर्वात लांबीचा 2.2 किलोमीटर लांब उड्डाणपूल आहे.
  • पुणे महापालिकेने या पुलासाठी जवळपास 118 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यात विठ्ठलवाडी- फनटाईम थिएटर हा उड्डाणपूल तयार झाला आहे.
  • याशिवाय महापालिकेने आणखी दोन उड्डाणपूल सिंहगड रोडवर उभारले आहेत. त्यातील एकाचे काम पुर्ण होऊन तो वाहतूकीसाठी खुला झाला आहे.
  • सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी- फनटाईम थिएटर हा उड्डाणपूल वाहतूकीसाठी सुरु होणारा दुसरा पूल आहे. याशिवाय एका पुलाचे काम 30 टक्के बाकी आहे.
  • कधी आणि कुणाच्या हस्ते होणार उद्घाटन
  • विठ्ठलवाडी- फनटाईम थिएटर या उड्डाणपूलाचे उद्घाटन 27 एप्रिल 2025 रोजी होणार आहे. या पुलाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. येत्या रविवारपासून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

हेही वाचा : खूशखबर! मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, संभाजीनगरला मिळणार हक्काचे घर; 'या' योजनेतून बांधणार २० हजार घरे

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+