Tanisha Bhise : होय, त्या दिवशी 10 लाख डिपॉझीट मागितले होते; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची कबुली
Tanisha Bhise death case : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे या गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेमुळं रुग्णालय प्रशासनावर मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होताना दिसत आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. याबाबतची माहिती रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकर यांनी दिली आहे.
10 लाख मागितल्याची कबुली
दरम्यान, दीनानाथ रुग्णालयाचे डीन यांनी पैसे मागितल्याची कबुली दिली आहे. डॉ. केळकर म्हणाले की, त्या दिवशी गर्भवती महिलेकडे 10 लाखांची डिपॉझिट मागितले होते. आम्ही डिपॉझिट घेत नाही, पण त्या दिवशी राहू-केतू काय झालं माहिती नाही, पण 10 लाखांची डिपॉझिट मागितल्याचे केळकर म्हणाले.

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाची व्याप्ती व गंभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या राजीनामापत्र लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन विश्वस्त मंडळासमोर ठेवला आहे. पण माझी खात्री आहे की विश्वस्त मंडळ हा राजीनामा एक्सेप्ट करेल असे केळकर म्हणाले.
डॉ. केळकर म्हणाले की, डॉ. घैसास यांना अनेक धमक्यांचे फोन येत आहेत. ते दडपणाखाली वावरत आहेत. तसेच समाजमाध्यमांवर त्यांच्यावर कठोर टीका देखील होत आहे. यामुळं तणावाचे वातावरण तयार झाले आहे. परिणामी डॉ. घैसास यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्जावर डिपॉझिट लिहायची पद्धत नाही..
डॉ. केळकर म्हणाले की, अद्याप आमच्याकडे शासकीय अहवाल आलेला नाही. अहवाल आल्यानंतर त्यावर बोलणं योग्य होईल. डिपॉझिट फक्त त्यांच्यामध्येच होते जे पेशंट हाय रिस्क असतात. तेही पेशंट गरीब असले तर घेत नव्हते. जे पेशंट भरु शकतात त्यांच्याकडून घेते होते असेही केळकर म्हणाले.
आता डिपॉझिटची प्रक्रिया बंद केली असल्याचे केळकर म्हणाले. आमच्याकडे अर्जावर डिपॉझिट लिहायची पद्धत नाही. पण त्यादिवशी राहू-केतू काय झालं माहिती नाही, पण 10 लाखांची डिपॉझिट मागितल्याचे केळकर म्हणाले. पण असं कोणीही लिहीत नाही. मी दररोज 10 शस्त्रक्रिया करतो. आजपर्यंत किती केल्या असतील पण मी कधीही असं डिपॉझिट मागितलं नाही, असेही डॉक्टर म्हणाले.












Click it and Unblock the Notifications