Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

धक्कादायक! नीटमध्ये 98 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या MBBSच्या विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या

Pune News MBBS student commits suicide He is from Beed : पुण्यात एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने आई वडिलांना चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गंभीर बाब म्हणजे त्याने Whats App वर स्टेटस ठेवून त्याने ही आत्महत्या केली. हा विद्यार्थी मुळ बीडचा होता.

प्राप्त माहितीनुसार, उत्कर्ष असे मृताचे नाव आहे. तो भोपाळ येथे शिक्षण घेत होता. तेथे एम्स अर्थात ऑफ इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे वैद्यकीय शिक्षण घेत होता.

Pune News MBBS student commits suicide He is from Beed

शिक्षण भोपाळला, पुण्यात आत्महत्या

न्यूज 18 मराठीच्या वृत्तानुसार,उत्कर्ष हा भोपाळमध्ये शिक्षण घेत होता. आठ मे रोजी आयोजित एएफएमसी मैदानावर आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत सहभाग त्याने घेतला होता या स्पर्धेसाठीच तो पुण्यात आला होता. पुण्यात त्याने सोमवारी त्याने आर्म फोर्सेस मेडिलकल काॅलेजच्या वसतीगृहाच्या बाथरुममध्ये स्वःतच्या अंगावर चाकूने वार करुन आत्महत्या केली.

रात्री डिजे नाईटमध्ये एन्जाॅय पहाटे घटना

उत्कर्षने 12 मे रोजी आत्महत्येपुर्वी एक चिठ्ठी लिहीली आहे. ज्या दिवशी त्याने आत्महत्या केली, त्याच्या आदल्यादिवशी त्याने महाविद्यालयाच्या फेस्टीव्हलमध्ये मित्रांसह डिजे नाईट एन्जाॅय केला होता अशी माहिती मिळत आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो भोपाळला जाणार होता.

आत्महत्येसाठी ऑनलाईन चाकू ऑर्डर केला

सदर विद्यार्थी केवळ 20 वर्षांचा असून त्याने प्राथमिक माहितीनुसार शैक्षणिक ताणतणाव आणि निराशेतून आत्महत्या केल्याचे समजते. त्याने आत्महत्येसाठी चाकू ऑनलाईन पद्धतीने मागवला होता.

अशी केली आत्महत्या, चिठ्ठीही लिहीली

उत्कर्षने ऑनलाईन मागवलेला चाकू स्वःतच्या पोटावर खूपसून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने आत्महत्येपुर्वी एक चिठ्ठी लिहीली असून त्यात त्याने आई-वडीलांसाठी लिहिलेल्या चिठ्ठीत शिक्षणमंत्र्यांना उद्देशून मुघल, फ्रेंच आणि रशियन यांचा इतिहास काढून महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र समाविष्ट करावे असेही चिठ्ठीत लिहिले आहे. माहिती अशी मिळते की, उत्कर्ष एक वर्षापासून ताण-तणावात असायचा तसेच तो नैराश्याने ग्रस्त होता. त्याच्यावर उपचारही सुरु होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+