Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Pune News: 'लोकांचे कपडे पाहून...'; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविषयी रवींद्र धंगेकरांचा खळबळजनक आरोप

Ravindra Dhangekar on Dinanath Mangeshkar Hospital : पुणे शहरातील तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यूची घटना मागील आठवड्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने झाल्याचे उघडकीस आले आहे. शासनाच्या चौकशी अहवालातून हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

एकीकडे रुग्णालयाने उपचारांसाठी 10 लाख रुपये अनामत रक्कम मागितली, ती न दिल्याने उपचारांना उशीर झाला आणि तनिषा भिसे दगावल्या असा आरोप नातेवाईकांना केला आहे. त्यानंतर चौकशी अहवालात देखील तसे उघडकीस आले आहे. आता या प्रकरणावर शिवसेना नेते तथा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया देत मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

Ravindra Dhangekar

धंगेकर यांनी काय केले गंभीर आरोप?

एका मराठी वृत्तवाहिणीशी बोलताना माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, मंगेशकर परिवाराचे योगदान या देशासाठी महत्त्वाचे आहे. पण मंगेशकर परिवार आणि हॉस्पिटल हा भाग वेगळा आहे. मंगेशकर कुटुंबियाच्या नावाने सरकारने हॉस्पिटलला करोडो रुपयाची जागा मोफत दिली आहे.

महानगरपालिकेचा 27 कोटी रुपयांचा टॅक्स बाकी आहे. त्यांना शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड झालेला आहे, तो देखील त्यांनी भरलेला नाही. हे सगळं कोणाच्या जिवावर चालते? यांच्या पाठीशी कोण आहे?, असा माझा सवाल आहे.

लोकांचे कपडे बघूनच प्रवेश देतात

रवींद्र धंगेकर यांनी पुढे बोलताना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात लाखो पेशंट येत असतात. त्या पेशंटला कशा पद्धतीने ट्रीट केले जाते? हे आपण बघितले आहे. संचालक तिथे मालक म्हणून वावरतात. त्यांना राजकीय पाठिंबा असल्याने आपले कोणीही काही वाकडे करू शकत नाही, या धुंदीत ते सद्या वागत आहेत. एवढंच नाही, धंगेकर म्हणाले की, दीनानाथ रुग्णालयात लोकांचे कपडे बघून आतमध्ये प्रवेश दिला जातो, असा खळबळजनक आरोप देखील त्यांनी केला.

हॉस्पिटलवर प्रशासक नेमला पाहिजे?

माजी आमदार तथा शिवसेना नेते रवींद्र धंगेकर म्हणाले की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नियमाप्रमाणे काम होत नाही. तिथे व्यवसाय होत असल्याने रुग्णाला कुठेही दिलासा मिळत नाही. शासनाने हे रुग्णालय ताब्यात घेतले पाहिजे आणि यावर प्रशासक नेमला पाहिजे, अशी मागणी माझी शासनाकडे मागणी राहिल. रवींद्र धंगेकर म्हणाले. राज्य सरकारने या हॉस्पिटलला वेगवेगळे सुविधा दिल्या आहेत. या हॉस्पिटलने आतापर्यंत कोट्यावधी रुपयाचा कर देखील थकवला आहे, असा गंभीर आरोप केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+