पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा मृत्यू
पुणे : पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. दाटधुक्यामुळे हेलिकॉप्टरचा कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. दोन पायलट आणि एक इंजिनियर यांचा मृत्यू झाल्याची माहीती आहे.

पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचं काम सुरु आहे.
Maharashtra | Two people feared dead in a helicopter crash near Bavdhan in Pune district. Two ambulances and four fire tenders present at the spot.
— ANI (@ANI) October 2, 2024
(Pic Source: Pune Fire Department) https://t.co/3iuStSLkgL pic.twitter.com/mp09RSpP7m
मिळालेल्या माहीतीनुसार आज पहाटे अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट आणि एक इंजिनीअरचा समावेश होता. हे हेलिकॉप्टर मुंबईच्या दिशेने निघाले होते अशी माहिती आहे. हेलिकॉप्टर उड्डाण केल्यानंतर काहीवेळातच हेलिकॉप्टर दरीत कोसळले. हा अपघात कशामुळे कसा घडला,याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.
बावधन परिसरात एका टेकडीवर ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आहे. या हेलिपॅडवरुन आज सकाळाळच्या सुमारास हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. मात्र दोन दिवसापासून या परिसरात धुक्याची चादर असल्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे बोललं जातं आहे. अपघात झाल्यानंतर हेलिकॉप्टरने लगेच पेट घेतला. या हेलिकॉप्टर अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामध्ये दोन पायलट आणि एका इंजिनिअर यांचा समावेश असल्याची माहिती आहे. स्थानिक लोकांनी अपघाताची माहिती पोलिस यंत्रणेला दिल्यानंतर काही वेळातच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, पोलीस प्रशासन आणि यंत्रणा बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या.












Click it and Unblock the Notifications