पुणे - नागपूर वंदे भारत ट्रेन कधी सुरु होणार? आली मोठी अपडेट, 9 स्टेशनवर थांबे, 3 तास वाचणार!
Pune Nagpur Vande Bharat train will run from August : पुणे- नागपूरसाठीआखी एक वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार असून या शहरांदरम्यान वंदे भारत ट्रेन मिळावी ही आता मागणी पुर्ण होत आहे. विशेष म्हणजे याच महिन्यात पुणे ते नागपूर ही वदे भारत ट्रेन धावणार आहे, अशी अपडेट समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पुणे - नागपूर ही वंदे भारत ट्रेन आपल्या प्रवासादरम्यान 9 स्थानकावर थांबणार आहे. यासंदर्भात साम टीव्हीने रेल्वे बोर्डातील एका अधिकाऱ्याचा हवाला दिला आहे.

पुणे ते नागपूर रेल्वे कनेक्टीव्हीटीची कमतरता
पुणे ते नागपूरदरम्यान रेल्वे कनेक्टिव्हीटी कमी आहे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे दळणवळणाची कमतरता पाहता दोन्ही शहरातील नागरिकांची नवीन रेल्वे सुरु करण्यासंदर्भात मागणी होती, आता नव्याने वंदे भारत ट्रेन मिळत असल्याने दळणवळणात भर पडून जलद प्रवासाचीही सोय होणार आहे.
नागपूरला पोहचायला किती वेळ लागणार, अंतर किती वाचेल
पुणे ते नागपूर जाण्यासाठी साधारणतः 12 ते 13 तास लागतात. वंदे भारत ट्रेन हेच अंतर 10 तासात कापणार आहे. म्हणजेच पुणे - नागपूर प्रवास करणाऱ्यांचा दोन ते तीन तास वाचणार आहेत.
वंदे भारत कोणकोणत्या स्थानकावर थांबणार
वंदे भारत आपल्या 10 तासांच्या प्रवासात पुण्याहून निघल्यानंतर दौंडला थांबेल. त्यानंतर अहिल्यानगर-कोपरगाव-मनमाड-जळगाव-भुसावळ-अकोला-बडनेरा-वर्धा अशा 9 स्थानकावर थांबणार आहे त्यानंतर शेवटचे स्थानक नागपूर असेल.
कधी सुरु होणार वंदे भारत ट्रेन
मिडिया रिपोर्टनुसार, पुणे-नागपूर वंदे भारत ट्रेन या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट 2025 मध्ये सुरु होणार आहे. तत्पुर्वी वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक निश्चित होणार आहे.
भारतातील वंदे भारत ट्रेनची संख्या किती?
मीडिया रिपोर्टनुसार 2024 मध्ये भारतीय रेल्वेने 30 पेक्षा जास्त वंदे भारत एक्सप्रेस होत्या. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच वेळी दहा वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या. 2024 अखेरपर्यंत देशातील वंदे भारत एक्सप्रेस ची संख्या 136 वर पोहोचली आहे.
महाराष्ट्रात किती आहेत वंदे भारत ट्रेन?
महाराष्ट्रात आजपर्यंत 11 महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन धावत आहेत.
गेल्या वर्षी देशात 10 वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या, त्यात महाराष्ट्राला सुद्धा तीन गाड्या मिळाल्या होत्या.
महाराष्ट्रातून सध्या या मार्गावर धावतात वंदे भारत ट्रेन
20 मार्च 2025 पर्यंत महाराष्ट्रात सीएसएमटी (मुंबई) ते जालना -(आता सीएसएमटी ते नांदेड), सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या अकरा मार्गांवर वंदे भारत ट्रेन धावत आहेत.












Click it and Unblock the Notifications