एमपीएससीची परीक्षा पुढे ढकली, परीक्षा तारीख लवकरचं जाहीर होणार, पण विद्यार्थी आंदोलनावर ठाम
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास करणा-या विद्यार्थांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे.या विद्यार्थींनी केलेल्या आंदोलनानंतर 25 ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत एमपीएससीने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल," असं आयोगाने ट्टिटमध्ये म्हटलं आहे. मात्र विद्यार्थी अजून ही आंदोलनावर ठाम असल्याची माहीती मिळत आहे.

आयबीपीएस परीक्षा व एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियमित राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन परीक्षा एकाच दिवशी म्हणजे 25 ऑगस्टला होणार होती. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसमोर पेच निर्माण झाला. यासंदर्भात सरकार दरबारी वारंवार मागणी करूनदेखील त्याची पुरेशी दखल घेतली गेली नसल्यामुळे मंगळवारी रात्रीपासूनच या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केलं होतं. परीक्षांच्या तारखा बदलाव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती.
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल. @MahaDGIPR @CMOMaharashtra https://t.co/uLEWi1xBoE
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) August 22, 2024
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आज गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर एमपीएससीने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन 25 ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आहे, अशी माहिती दिली आहे. तसेच परीक्षा तारीख लवकरचं जाहीर केलं जाईल, असं सांगण्यात आलं आहे.
शरद पवारांनी सरकारला दिला होता अल्टिमेटम!
परीक्षार्थींनी आपली मागणी आंदोलनाच्या माध्यमातून मांडली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. त्याशिवाय, भाजपाकडूनही काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन याबाबत भूमिका मांडली आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी शिंदे सरकारला अल्टिमेटम दिला आहे. बुधवारी रात्री 12 च्या सुमारास शरद पवार यांच्या एक्स अकाऊंटवर यासंदर्भात केलेल्या पोस्टमध्ये माहिती देण्यात आली आहे.
आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर शरद पवार म्हणाले की, "पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार", असं शरद पवार या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.












Click it and Unblock the Notifications