Pune Metro: पुणे मेट्रोच्या 42 किमी विस्तारामुळे कनेक्टीव्हीटी वाढणार; हजारो प्रवाशांना फायदा होणार!
Pune Metro : दिवसेंदिवस पुण्याची वाहतूक समस्या जटील होत असून वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना रस्त्यावर बराच काळ ताटकाळत राहावे लागते. अशा स्थितीत वाहनधारकांची कोंडी सुरु असतानाच मेट्रोने एक गुड न्यूज दिली आहे.
पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होत असून महामेट्रो सध्या 42 किमी लांबीचा एक नवीन मेट्रो मार्ग विकसित करत आहे, तपशीलवार प्रकल्प अहवाल (DPR) पूर्णत्वाच्या जवळ आहे. त्यामुळे सुरक्षित सार्वजनिक वाहतुकीला बळ मिळणार आहे.

42 किलोमीटर नवीन मेट्रो मार्गाचा काय होणार फायदा
पिंपरी - चिंचवड मेट्रोचा विस्तार होत असून नवीन मेट्रो मार्गाचा मोठा लाभ प्रवाशांना होणार आहे. या विस्तारामुळे पुण्यातील प्रमुख भागांशी कनेक्टिव्हिटी वाढेल आणि हजारो दैनंदिन प्रवाशांचा प्रवास सुलभ होईल. प्रकल्पाच्या प्रगतीतील महत्त्वाचा टप्पा म्हणून पुढील महिन्यात डीपीआरला अंतिम रूप दिले जाण्याची अपेक्षा आहे.
कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मेट्रोचा विस्तार
पिंपरी - चिंचवडमध्ये होत असलेल्या नवीन मेट्रो मार्गामुळे शहरातील प्रमुख भाग मेट्रोने जोडले जात आहेत. निगडी, नाशिकरोड, भोसरी, मोशी, वाकड बायपास, रावेत, मुकाई चौक, पुणे-मुंबई-बेंगळुरू महामार्ग, पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव या महत्त्वाच्या भाग मेट्रोने जोडले जातील.
महत्वाचे भाग मेट्रोने जोडल्याचा फायदा काय होणार
पिंपरी-चिंचवड शहरातील महत्वाचे आणि मोक्याची ठिकाणे जोडल्याने वाहतूक कोंडीसारखी समस्या कमी होण्यास मदत होईल आणि शहरभर जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल.
एक वर्षांपासून सुरु आहे मेट्रो प्रकल्प
महा मेट्रोचा हा प्रकल्प जवळपास एकवर्षापासून सुरू आहे. हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून तपशीलवार प्रकल्प अहवाल (DPR) मध्ये मार्ग संरेखन, स्थानकांची नियुक्ती, भूसंपादन गरजा आणि अंदाजित प्रवासी वाहतूक यासारख्या बाबींचा समावेश आहे.एकदा अंतिम झाल्यानंतर, डीपीआर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे (PCMC) पुनरावलोकनासाठी सादर केला जाईल, त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी राज्य आणि केंद्र प्राधिकरणांना सादर केला जाईल.
पिंपरी चिंचवडसाठी - दुसरी मेट्रो लाईन
या विस्तारामुळे पिंपरी चिंचवडमधील दुसऱ्या मेट्रो मार्गाचा विकास होत आहे. दापोडी ते PCMC ला जोडणारी पहिली लाईन आधीच कार्यरत आहे आणि त्यामुळे अनेकांसाठी प्रवास करणे अधिक सोयीचे झाले आहे. पीसीएमसी ते निगडीपर्यंत नवीन पट्ट्याचे बांधकामही सुरू आहे. या विस्तारामुळे विशेषत: उपनगरातील रहिवाशांसाठी कनेक्टिव्हिटी आणखी वाढेल.
अपघाताच्या घटनांमध्ये घट
मेट्रो मार्गांच्या विस्ताराने शहरातील वाहतूक कोंडी कमी तर होत आहेच पण वाहनांचे अपघातातही काही प्रमाणात घट झाली आहे. 6 मार्च 2022 रोजी सुरू झाल्यापासून, पुणे मेट्रोने रहिवाशांना जलद, विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक वाहतुकीची सुविधा देत यशस्वी मोहीमेची तीन वर्षे पूर्ण केली आहेत.












Click it and Unblock the Notifications