लाडक्या बहीणींना पुढच्या पाच वर्षांमध्ये 90 हजार रूपये देणार- अजित पवार
पुणे : पुढच्या पाच वर्षांमध्ये लाडक्या बहिणींना 90 हजार रूपये देण्याचं काम आम्ही करणार आहोत, फक्त पुढच्या पंचवार्षिकला आम्हाला निवडणून द्या, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुण्याच्या बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ पार पडला. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थितीत होते.
आपल्याला सातत्यत टीकवायचं आहे. ते तुमच्या हातात आहे. हे सातत्य टिकवतं असताना पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला निवडणून द्या, आम्ही तुमच्या खात्यात पुढील पाच वर्षात 90 हजार रूपये देण्याचं काम करू. आम्ही शब्दांचे पक्के आहोत, आम्ही वेळ मारून नेणारे नाहीत. जे बोलतो ते करतो, अजित पवार असं यांनी म्हटलं आहे.

विरोधक कारण नसताना टीका करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र लाडक्या बहिणीमय झाला आहे, आमच्या मनात काही वेगळी भावना नाही. अर्थ संकल्प मांडताना आमची बहीण, महिला सक्षम झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं होतं. विरोधक फक्त बहिणीकडे लक्ष दिलं असं म्हणतात, मात्र भावाकडेही आम्ही लक्ष दिले आहे. यापुढे कुणीही लाईट बिल भरायचं नाही, तुमची लाईट कोण कट करायला येत तेच बघतो, हे भावासाठी केलं आहे.युवक युवतींना प्रशिक्षणार्थींसाठी वेतन सुरू केलं. हे सरकार सर्व सामान्य जनतेचं सरकार आहे. काहीजण कोर्टात गेले, पण कोर्टात टिकले नाही, मग काय करायच असं विरोधकांना वाटायला लागलं, अशी टीका अजित पवारांनी विरोधकांवर केली आहे.
आज पर्यंत एक कोटी तीन लाख फॉर्म जमा झाले आहेत. महिलांना सबल करण्यासाठी ही योजना आणली आहे. आमच्या राजकीय जीवनातला आजचा हा दिवस आनंदाचा आहे. पुढेही या योजनेत सातत्य रहाणार आहे, पुढील पाच वर्ष या सर्व योजना पुढे चालू ठेवायच्या की, नाही हे तुमच्या हातात आहे, त्यासाठी कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळकडे लक्ष द्या, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications