'हिंमत असेल तर एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच' खा. सुप्रिया सुळेंची महायुती सरकारवर टीका
पुणे : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' ही गरजू महिलांच्या घरसंसाराला हातभार लावणारी कल्याणकारी योजना महायुती सरकारच्या संकल्पनेतून आकाराला आली आहे. या योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आज (ता. 17) शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणार आहे.
राज्यातील 15 हजाराहून अधिक लाभार्थी प्रातिनिधिक स्वरुपात कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थींना रक्कम जमा केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सरकारकडून या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

दरम्यान एका व्हायरल मेसेजमुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. शरद पवार गटाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअपचा स्क्रिन शॉट सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हॉट्सअ मेसेज म्हटलं आहे की, लाभार्थी महिलांना आज बालेवाडी येथील कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. ज्या महिला महिला या कार्यक्रमाला येणार नाहीत. त्याचा फॉर्म रद्द होईल. हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर खा. सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
खा. सुप्रिया सुळे यांनी ट्टिटवर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला 'भाऊ' म्हणवितात आहेत... बहिणीला कार्यक्रमाला बोलाविणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार... अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, 'बहिण-भावाचं' नातं एवढं स्वस्त नसतं. बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहिण त्याला नाही म्हणत नाही. पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा. हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच." अशी पोस्ट करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला 'भाऊ' म्हणवितात आहेत... बहिणीला कार्यक्रमाला बोलाविणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार... अरे सत्तेत बसलेल्या भावांनो,… pic.twitter.com/lRiUz3e1Kv
— Supriya Sule (@supriya_sule) August 17, 2024
पुणे जिल्ह्यातील 5 लाखावर महिलांच्या खात्यावर रक्कम जमा
या योजनेंतर्गत पात्र महिलांना प्रतिमाह 1 हजार 500 रुपयांचा लाभ देण्यात येत असून जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये लाभार्थी भगिनींच्या खात्यावर जमा होण्यास 14 ऑगस्टपासूनच सुरूवात झाली आहे. आजपर्यंत पुणे जिल्ह्यातील 5 लाखाहून अधिक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर या योजनेची रक्कम जमा झाली आहे.
बहिणींसाठी अखंड कार्यरत आहे यंत्रणा
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'अंतर्गत सर्व पात्र महिलांना लाभ मिळेल, कोणीही पात्र भगिनी वंचित राहणार असे निर्देश दिले होते. त्यादृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा अखंड कार्यरत ठेवल्यामुळे राज्यात सर्वाधिक महिलांची नोंदणी पुणे जिल्ह्यात झाली आहे. राज्यात 1 कोटी 56 लाख 61 हजार 209 महिलांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी राज्यात सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील 9 लाख 74 हजार 66 महिलांनी नोंदणी केली आहे.












Click it and Unblock the Notifications