Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Pune Hit and Run: पुण्यात सुसाट टेम्पाने 8 जणांना उडवले! मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू

Pune Hit and Run :पुण्यातील कल्याणीनगर भागातील पोर्शे कार अपघात प्रकरण देशभरात गाजले होते. आता शहरातील कोथरुडमधील पौडफाटा भागात एका टेम्पो चालकाने दारुच्या नशेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी त्याच्या पत्नीच्या अंगावर गाडी घातल्याचा प्रकार घडला आहे. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

प्राथमिक माहितीनुसार, कोथरुडमधील करिश्मा चौकात रविवारी रात्री टेम्पो चालक आशिष पवार हा दारुच्या नशेत करिश्मा चौकातील गाड्यांना धडक देत जात होता. यात त्याने एका कारलाही धडक दिली. तिथून पुढे त्याचा टेम्पो करिश्मा सिग्नलजवळ आला तेव्हा त्याठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे आणि त्यांची पत्नी गीतांजली अमराळे उभे होते. त्यावेळी चालक आशिषने टेम्पो त्यांच्या अंगावर घातला.

Pune Hit and Run

मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू

या दुर्घटनेत गीतांजली अमराळे यांच्या अंगावरुन टेम्पो गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर श्रीकांत अमराळे हे गंभीर जखमी झाले. हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाहिला. त्यांनी आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

दोन लहान मुलानांही उडवले

करिश्मा चौकापासून मद्यधुंद टेम्पो चालक आशिष पवार सात ते आठ जणांना उडवत आला. छोट्या टेम्पोने आधी करिश्मा चौकातील सिग्नलला दोन लहान मुलांना उडवले.

जमावाने चालकाला पकडले

मद्यधुंद पवार एवढ्यावरच थांबला नाही. त्याने टेम्पो तसाच पुढे नेला आणि काही गाड्यांच्या अंगावर वाहन नेले. त्यानंतर पौड फाटा येथे सावरकर उड्डाण पुलाजवळील सिग्नल तोडत दोन स्कुटींना धडक दिली. यानंतर टेम्पो चालकाने एका कारला धडक दिली. या घटनेनंतर जमावाने मध्यधुंद टेम्पो चालकाला खाली उतरवत मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचले आणि आरोपीला ताब्यात घेतले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+