Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुण्यातील टेम्पो ट्रॅव्हल्सला आग प्रकरणात नवीन खुलासा, पगार कापला आणि कर्मचा-यांशी वादामुळे लावली आग

पुण्यातील हिंजवडी परिसरात गुरुवारी टेम्पो ट्रॅव्हल्सला आग लागल्याने चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता प्रकरणाचा नवीन खुलासा समोर आला आहे. हा अपघात नसून बस चालक जनार्दन हंबर्डीकरचा सुनियोजित कट होता.

पोलिस तपासात हा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी खुलासा केला आहे की, बस चालकाने जाणूनबुजून गाडी पेटवली आणि अपघात असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. पोलिस तपासात असे दिसून आले आहे की, चालक त्याच्या सहकाऱ्यांवर रागावला होता आणि त्याने बदला घेण्यासाठी ही घटना घडवली.

tempo traveler bus fire case

पगार कपात आणि कर्मचाऱ्यांबाबत वाद सुरू होता

कंपनीकडून दिवाळीत मिळालेलं कमी मानधन आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून मिळालेली अपमानास्पद वागणूक याचा बदला घेण्यासाठी बस चालक जनार्दन हंबर्डेकरने हा गुन्हा केला. कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादामुळे आणि पगारात वाढ न झाल्यामुळे तो संतप्त झाला होता, त्यामुळे त्याने हे कृत्य केले. मंगळवारीच आरोपी चालकाने त्याच्या कंपनीतून "बेंझिम सोल्युशन" नावाचे एक लिटर केमिकल आणले आणि ते बसमध्ये ठेवले. याशिवाय त्याने सीटखाली काही कपडेही ठेवले होते. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी तो कर्मचाऱ्यांना घेण्यासाठी बाहेर पडला तेव्हा वाटेत त्याने वारजे परिसरातून एक आगपेटी खरेदी केली.

बस हिंजवडी फेज वन परिसरात पोहोचताच त्याने तिथे आधीच ठेवलेले कपडे पेटवून दिले. केमिकलमुळे आग वेगाने पसरली. आग लागल्यानंतर चालकाने ताबडतोब बसमधून उडी मारली, तर बसमधील इतर कर्मचारी आगीत अडकले. आगीत बस चालकालाही किरकोळ दुखापत झाली. पण त्याने पोलिसांसमोर बेशुद्ध असल्याचे नाटक केले. चौकशीदरम्यान अस्पष्ट उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याचा हा कट उघडकीस आला.

टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये एकूण 12 प्रवासी होते. आग लागल्यानंतर काही कर्मचारी बाहेर पडण्यात यशस्वी झाले, परंतु त्यांचे चार सहकारी गाडीतून बाहेर येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. इतर जखमींना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेचा पोलिसांनी तपास केला असता अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+