Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Pune Crime News : माझ्या बदनामीला जबाबदार कोण? स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरणातील पीडितेचा सवाल

Pune Crime News : स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये घडलेल्या अत्याचार प्रकरणाचे राज्यात पडसाद उमटले. यानंतर पीडितेनेही "माझ्या बदनामीला जबाबदार कोण?" असा मोठा गंभीर सवाल पीडितेने विचारला आहे, यावर पोलिस निशब्द झाले होते.

सरकारनामाने यासंदर्भात वृत्त दिले आहे, त्यानुसार, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील महिलेची बदनामी करणारे वृत्त येत असल्याने याच्यावर बंदी घालावी याबाबतचा अर्ज पुण्यातील विधिज्ज्ञ असीम सरोदे यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र डूडी यांच्याकडे केला आहे.

Pune Crime News Who is responsible for my defamation

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचा पीडितेशी संवाद

स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती, त्यानंतर या प्रकरणात संशयित दत्ता गाडे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला, त्यानंतर त्याला अटकही झाली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर पीडित मुलीशी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यावेळी पीडितेने "माझ्या बदनामीला कोण जबाबदार आहे?" असा सवाल केला, त्यावेळी पोलिस निरुत्तर होते.

संशयित दत्ता गाडेचा आणखी एक कारनामा

स्वारगेट शिवशाही बसमधील अत्याचार प्रकरणातील संशयित दत्ता गाडे याचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. त्याचा पोलिसी गणवेशातील फोटो समोर आला आहे. तो पोलिस असल्याचे फासवून महिलांना गंडवत असल्याची बाब समोर आली आहे. विवाहबाह्य संबंध असलेल्या मिहलांचे लाॅजच्या बाहेर चित्रिकरण करुन तो त्यांना ब्लॅकमेल करत असल्याची प्रथमरदर्शनी बाब समोर आली आहे.

काय आहे अत्याचार प्रकरण?

स्वारगेट बसस्थानकात पहाटे पाचनंतर एका प्रवासी तरुणीला चुकीची माहिती देऊन डेपोत थांबलेल्या शिवशाहीमध्ये नेऊन दत्ता गाडे याने तरुणीवर अत्याचार केला, यासंदर्भात तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाची वाच्यता झाली.

कोण आहे दत्ता गाडे?

अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा एक सराईत गुन्हेगार आहे. तो मूळचा शिरूरचा आहे. त्याच्यावर शिक्रापूर व शिरूर पोलिस ठाण्यात चेन स्नॅचिंग सारखे गुन्हे नोंद आहेत. हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असलला तरी स्वारगेट बसस्टँडसारख्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेली ही घटना कुणालाच कशी कळली नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. गंभीर गोष्ट म्हणजे बलात्कार झाल्यानंतरही पुण्यात त्या तरुणीची कुणीही मदत केली नसल्याचा दावाही या प्रकरणी केला जात आहे. यामुळे समाजाच्या मानसिकतेवरही सवाल उपस्थित होत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+