Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Pune Crime News : पाणी आणायला गेला अन् अडकला! स्वारगेट बसस्थानकातील बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक

Pune Crime News Update : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये एका प्रवासी तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणानंतर संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याला त्याच्या गावातून ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

पाणी मागितले अन् अडकला

संशयित दत्तात्रय गाडे हा ऊसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता त्याचे कपडे आढळून आले त्यामुळे तो या शेतशिवरातच असेल असा कयास पोलिसांनी लावला, दरम्यान रात्री तहान लागल्याने संशयिताने गावातील एका घरी पाणी मागितले, पाणी बाटलीत घेऊन तो पुन्हा शेतात पसार झाला. काही गावकऱ्यांनी त्याला पाहिल्यानंतर संशय आला आणि त्यानंतर ही खबर पोलिसांपर्यंत पोहचताच त्याला ताब्यात घेण्यात आले.

Pune Crime News Update

ऊसाच्या शेतात शोधाशोध..!

सूत्रांनी सांगितले की, आरोपी हा पुण्याच्या आसपास असलेल्या ऊसाच्या शेतातच लपून बसला असावा अशी शक्यता जाणून पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केला, गुरुवारी 27 फेब्रुवारी 2025 रोजी पुण्याच्या आसपास ऊसाचा परिसर मोठा आहे. तेथे पोलिसांकडून शोध मोहिम सुरु होती. पोलिसांनी स्निफर डॉग आणि ड्रोन तैनात केले होते. काही ठिकाणी ऊस थेट दहा फुटांपर्यंत मोठा असल्याने पोलिसांचा ड्रोन कॅमेऱ्याद्वारे शोधाचा विचार होता.

1 लाखांचे होते बक्षिस, 13 पथकांनी घेतला शोध

पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी 13 विशेष पथके स्थापन केली आहेत. गुन्हे शाखेच्या आठ पथकांचा त्यात समावेश आहे. गाडे याच्या कुटुंबातील सदस्यांशी आणि ओळखीच्या सहकाऱ्यांची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरु आहे. त्याच्यावर 1 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. 36 वर्षीयआरोपी गाडे पोलिस रेकाॅर्डवरचा आरोपी आहे. त्याने यापूर्वी पुणे अहिल्यानगर जिल्ह्यात चोरी, दरोडा आणि साखळी चोरीचे किमान 6 गुन्हे केले आहेत. तो 2019 पासून जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता.

काय म्हणाले होते गृहराज्यमंत्री?

योगेश कदम म्हणाले, जर त्वरीत ही बातमी बाहेर आली असती तर कदाचित आता जे संभाव्य लोकेशन मिळाले आहे ते मिळाले नसते, आरोपी लांब पळून जाण्याची शक्यता आहे. गुप्तता मात्र पाळली गेली घटना लपवलेली नाही. योगेश कदम म्हणाले, पुणे बसस्थानक परिसरात ही घटना घडलेली आहे. या भागात कितीवेळा गस्त घातली गेली याची माहिती मी घेतली आहे. घटनेच्या आधी रात्री दीड वाजता गस्त घातली गेली. तेथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तेथे पाहणी करायला गेले होते रात्री तीनवाजता दुसऱ्यांदाही ते पाहणी करुन गेले आहेत. पोलिसांकडून कोणतेही दुर्लक्ष झालेले नाही.

संशयित आरोपी दत्तात्रय गाडेची डिटेल्स माहिती?

या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा एक सराईत गुन्हेगार आहे. तो मूळचा शिरूरचा आहे. त्याच्यावर शिक्रापूर व शिरूर पोलिस ठाण्यात चेन स्नॅचिंग सारखे गुन्हे नोंद आहेत. त्याने स्वारगेट बसस्थानकावर तरुणीला चुकीची माहिती देऊन डेपोत थांबलेल्या शिवशाहीमध्ये नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असलला तरी स्वारगेट बसस्टँडसारख्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेली ही घटना कुणालाच कशी कळली नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. गंभीर गोष्ट म्हणजे बलात्कार झाल्यानंतरही पुण्यात त्या तरुणीची कुणीही मदत केली नसल्याचा दावाही या प्रकरणी केला जात आहे. यामुळे समाजाच्या मानसिकतेवरही सवाल उपस्थित होत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+